Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

सातारा जिल्हा

आदर्श कामगार उद्योगाचा कणा – जिवाजीराव मोहिते

आदर्श कामगार उद्योगाचा कणा – जिवाजीराव मोहिते
Ashok Ithape
  • PublishedMay 19, 2026

सातारा : १ मे कामगार दिनानिमित्ताने दिल्या जाणारे आदर्श कामगार पुरस्कारांचे वितरण अजिंक्यतारा सहकारी साखर कारखानाचे कार्यकारी अधिकारी मा जिवाजीराव मोहिते साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सभासद असणाऱ्या व कला क्रीडा, पर्यावरण सामाजिक, सांस्कृतिक व कंपनी उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते अशी माहिती श्री गजानन घाडगे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा श्री जिवाजीराव मोहिते साहेब यांचा सत्कार अध्यक्ष जयंत देशपांडे यांनी केला.

प्रतिष्ठानची स्थापना व पुरस्कार वितरणा मागील भूमिका संस्थापक गोपाळराव खजुरे व दिलिपराव चरेगावकर यांनी स्पष्ट केली.
सातारा येथील ज्येष्ठ उद्योजक मा श्री सुभाष दोशी यांचा सामाजिक व व्यवसायातील विशेष कार्यासाठी गौरविण्यात आले.

आदर्श कामगार पुरस्कार प्राप्त व सामाजिक कार्यकर्ते श्री रविंद्र पवार यांच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल श्री मोहिते साहेब यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

सौ रुपाली शहाजी कुंभार (काटदरे फुड प्रॉडक्ट्स प्रा लि सातारा), श्री महेंद्र एकनाथ जाधव ( अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना मर्या.शेंद्रे, सातारा), श्री सर्जेराव बाळू कोंडके (गरवारे टेक्निकल फायबर्स लि., वाई), श्री चंद्रकांत छबन जाधव (गोदरेज ॲड बॉईज मॅन्यु.कं.लि.मोटर्स सोलूशन ,शिंदेवाडी,ता.खंडाळा,जि.सातारा) श्री किरण निवृत्ती नायकवडी (गरवारे टेक्निकल फायबर्स,वाई), श्री बाळू किसनराव शेडगे (गोदरेज ॲड बॉईज मॅन्यु.कं.लि.मोटार्स सोलूशन शिंदेवाडी, खंडाळा,जि.सातारा) यांना आदर्श कामगार पुरस्कार
वितरण मा श्री जिवाजी मोहिते साहेब मॅनेजिंग डायरेक्टर अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.

ना.श्री छ शिवेंद्रराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र शासन) यांनी शुभसंदेश देऊन अभिनंदन केले.
आदर्श कामगार हा उद्योगाचा कणा असून, कंपनी व देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देत आहे असे गौरवोद्गार श्री जिवाजी मोहिते साहेब यांनी काढले.

प्रतिष्ठान करीत असलेले काम मोलाचं आहे असून जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे असे ही ते म्हणाले.
अध्यक्ष जयंत देशपांडे यांनी आस्थापन व कामगार यांच्यातील दरी कमी करुन, उद्योगासाठी पोषक वातावरण या पुरस्कारांमुळे होते असे सांगितले. आदर्श कामगारांचा परिचय विकास धुमाळ, हेमंत ढवळे, विठ्ठल तांबे यांनी करून दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री इकबाल काझी यांनी केले.
कार्यक्रमासाठी काटदरे फुड प्रॉडक्ट्सचे अनिलराव व शैलजा काटदरे, अभिजात इक्विपमेंटचे श्री सचिन दोशी, गरवारे टेक्निकल फायबर्सचे अंशुमन जगदाळे, जेष्ठ पत्रकार शरद महाजनी, मुकुंद फडके, मधुसूदन पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक, मित्र मंडळ, आस्थापनाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष अमृत साळुंखे, सरचिटणीस दादासाहेब काळे,संजय पवार, शरदराव वाघमळे , संजय गिरी यांनी परिश्रम घेतले. शंकरराव मांढरे यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!