Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

सामाजिक

वारकरी संप्रदायातील निष्ठावंत काळाच्या पडद्याआड; ‘पांडुरंगाच्या चरणी विसावला विठ्ठल’

वारकरी संप्रदायातील निष्ठावंत काळाच्या पडद्याआड; ‘पांडुरंगाच्या चरणी विसावला विठ्ठल’
Ashok Ithape
  • PublishedMay 3, 2026

वाई दि. ०३ : नावेची वाडी, वाई (ता. वाई) येथील रहिवासी आणि पत्रकार श्री. प्रविण गाडे यांचे वडील श्री. विठ्ठल अंतू गाडे (वय ७३) यांचे शनिवार, दि. २ मे रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून एका सात्विक आणि परोपकारी व्यक्तिमत्वाला समाज मुकला आहे.

विठ्ठल गाडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य अत्यंत साधेपणाने आणि परोपकारात व्यतीत केले. कोणाशीही वाद किंवा मतभेद न ठेवता, सर्वांशी मिळून-मिसळून वागण्याचा त्यांचा स्वभाव होता. आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांनी वारकरी संप्रदायाची कास धरली होती. पांडुरंगावरील अढळ श्रद्धा आणि भजन-कीर्तनाची आवड त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होती.

व्यवसायाने गवंडी असलेल्या विठ्ठल गाडे यांनी अत्यंत कष्टाने आणि प्रामाणिकपणे अनेकांची स्वप्नातील घरे बांधून पूर्ण केली. मात्र, दुर्दैवाने स्वतःच्या घराचे काम सुरू असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. स्वतःचे घर अर्ध्यावर सोडून ते अनंतात विलीन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.

रविवार, दि. ३ मे रोजी सकाळी वाई येथील रविवार पेठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन विवाहित मुली आणि सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्व. विठ्ठल गाडे यांचा सावडण्याचा विधी सोमवार, दिनांक ४ मे २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता रविवार पेठ, वाई येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती गाडे परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!