Thu, Apr 2, 2026
क्रीडा

बोरगावच्या यशदा वाडकरची राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेत झळाळती कामगिरी

बोरगावच्या यशदा वाडकरची राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेत झळाळती कामगिरी
Ashok Ithape
  • PublishedApril 2, 2026

रौप्य पदकासह आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; चीनमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार

वाई l प्रतिनिधी : नाशिक येथे दि. २८ ते ३० मार्च २०२६ दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय जम्प रोप क्रीडा स्पर्धेत बोरगाव येथील कुमारी यशदा मेघा वाडकर हिने उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. भारतीय जम्प रोप असोसिएशन, महाराष्ट्र जम्प रोप असोसिएशन तसेच नाशिक जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा उत्साहात पार पडली.

न्यू इंग्लिश स्कूल, बोरगाव येथील इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी असलेल्या यशदाने 30 सेकंद सिंगल बाउन्स व डबल अंडर या प्रकारात उत्कृष्ट कौशल्य दाखवत हे यश संपादन केले. तिच्या या कामगिरीमुळे तिची चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई जम्प रोप स्पर्धेसाठी निवड झाली असून, परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशाबद्दल यशदाचा सन्मान शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री अशोक दुधारे तसेच नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.

तिच्या या यशाबद्दल वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष श्री नारायणराव वाडकर, उपाध्यक्ष श्री नारायण वाडकर (गुरुजी), सचिव श्री मधुकर वाडकर, माजी अध्यक्ष श्री लक्ष्मणराव वाडकर (आप्पा), मुख्याध्यापक श्री संतोष वाडकर, भागशाळा प्रमुख श्री विठ्ठल जाधव, सचिव श्री नितीन सूर्यवंशी, क्रीडाशिक्षक व प्रशिक्षक श्री अजित वाडकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ व पालकांनी तिचे अभिनंदन केले.
यशदाच्या या यशामुळे बोरगाव शाळेचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले असून, इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!