देगाव ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची पाहणी; आशा सेविकांचा गौरव
![]()
गटविकास अधिकारी घोलप यांची सदिच्छा भेट; आयुष्यमान कार्ड काढून सात लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल आशा सेविकांचा गौरव
देगाव l प्रतिनिधी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत ग्रामपंचायत देगाव (ता. वाई) येथे पंचायत समिती वाईचे गटविकास अधिकारी श्री. घोलप यांनी सदिच्छा भेट देत ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) श्री. गायकवाड, कृषी विस्तार अधिकारी श्री. पवार यांचीही उपस्थिती होती.
या भेटीदरम्यान ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची पाहणी करण्यात आली. विशेषतः गावातील नागरिकांचे आयुष्यमान कार्ड काढण्याबाबत करण्यात आलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. आयुष्यमान कार्ड काढून सात लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल प्राथमिक आरोग्य उपकेंद्र देगाव येथील आशा सेविका सौ. मंजुषा यादव व सौ. निलम शिर्के यांचे अधिकाऱ्यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
यावेळी देगाव ग्रामपंचायत सरपंच श्री. सुरज पिसाळ, ग्रामपंचायत अधिकारी श्री. शहाजी बोभाटे, ग्रामरोजगार सेवक श्री. सचिन मांढरे, आरोग्य सेविका श्रीमती रूपाली कुमठेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगावचे मुख्याध्यापक श्री. निलेश शिंदे, शिक्षक श्री. झंजाड उपस्थित होते. तसेच अंगणवाडी सेविका सौ. जयश्री शेवते, सौ. सुजाता इथापे, सौ. राजश्री इथापे, महिला बचत समूह सीआरपी सौ. शैला इथापे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व देगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक करत शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.













