Sat, Apr 4, 2026
महाराष्ट्र

सुरूर–वाई–महाबळेश्वर–पोलादपूर मार्गाच्या कामांचा मंत्रालयात आढावा

सुरूर–वाई–महाबळेश्वर–पोलादपूर मार्गाच्या कामांचा मंत्रालयात आढावा
Ashok Ithape
  • PublishedMarch 12, 2026

मंत्री मकरंदआबा पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बैठक; वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील रस्ते विकासकामांवर चर्चा

मुंबई : सुरूर–वाई–महाबळेश्वर–पोलादपूर या महत्त्वाच्या मार्गावरील सुरू असलेल्या रस्ते विकासकामांचा मंत्रालय, मुंबई येथे सविस्तर आढावा घेण्यात आला. वाई–खंडाळा–महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री मकरंदआबा पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

या बैठकीत सुरूर–वाई–महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील कामांची सद्यस्थिती, कामांचा वेग, गुणवत्ता आणि उर्वरित कामांच्या नियोजनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध रस्ते विकासकामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

यावेळी स्थानिक नागरिकांकडून येत असलेल्या मागण्या आणि समस्या यांचाही आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. रस्ते विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावीपणे काम करण्याचे निर्देशही देण्यात आले.

या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोज कायंदे, सचिव (रस्ते) संजय दशपुते, एमएसआयडीसीचे मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा येथील अधीक्षक अभियंता तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रस्ते विकासाच्या कामांना गती देत परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!