Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

महिला विशेष

8 मार्च रोजी ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन

8 मार्च रोजी ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedMarch 3, 2026

ईगल फौंडेशनचे सन 2026 चे राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : ईगल फौंडेशनच्या वतीने रविवार दि. 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही निवडक व कर्तबगार महिलांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे कवी केशवसुत स्मारक मालगुंड जि. रत्नागिरी येथे रविवार दि. 8 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वा.करण्यात आले आहे.

त्यामध्ये सौ. वैदही रानडे (रत्नागिरी ),श्रीमती शैला गंगाधर बैसाणे (जळगाव ), सौ. भाग्यदेवी बाबुराव चौगले (सांगली), सौ. प्रियांका अविनाश नाईक (मुंबई ),प्रा. सौ. सुमेधा सावळ( सिंधुदुर्ग ), सौ. रुपाली विक्रम यादव ( शिराळा), सौ. सुनिता विजय अरगडे (पुणे), श्रीमती सुनिता रविंद्र परमणे (कागल), शोभाताई निवृत्ती होनमाने ( देवराष्ट्रे), प्रा. अश्विनी संजय पाटील ( कराड), ॲड.स्नेहल भिमराव गुरव ( कोल्हापूर ), सौ. व श्री सुलक्षणा आनंदा कांदळकर( राधानगरी ) ,सौ. स्नेहल संजोग खातू( रत्नागिरी ) यांचा समावेश आहे.

या सोहोळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन फौंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील, पदाधिकारी सर्वश्री श्री प्रकाश वंजोळे , श्री बाबासाहेब राशिनकर,श्री हणमंत कदम सर, पत्रकार श्री राजेश जोष्टे,श्री शिरीष कुलकर्णी, श्री शेखर सुर्यवंशी, पत्रकार श्री प्रशांत चव्हाण,श्री दिपक पोतदार, पत्रकार श्री दिनेश कांबळे, पत्रकार श्री सुनील पवार, पत्रकार श्री विजय जगताप, पत्रकार श्री वैभव पवार, मुख्याध्यापक पांडूरंग नाईक,ईगल न्यूज च्या संपादिका सौ. शालन कोळेकर, सौ. पुष्पावती वंजोळे,सौ. सुलक्षणा राशिनकर आदींनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!