अनवडी येथे कराटे परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
वाई : अनवडी ता. वाई येथील ओकीनावा शोतोकान कराटे क्लब यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. संस्थेचे मुख्य प्रशिक्षक श्री. अप्पा जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा पार पडली. पंच म्हणून श्री. विनोद माटे व श्री. अशोक कांबळे सर यांनी काम पाहिले.
या परीक्षेत एकूण ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. हे सर्व विद्यार्थी प्रशिक्षक सागर किर्दत सर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित कराटे प्रशिक्षण घेत आहेत. दिवसभर चाललेल्या कराटे परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना बेल्टचे वितरण करण्यात आले, तसेच काही उत्कृष्ट विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. शिवाजी निकम सर, अनवडी गावचे सरपंच श्री. गौतम मोरे, ग्रामपंचायत सदस्य श्री. अमोल शिंदे, विकास सोसायटीचे चेअरमन श्री. प्रकाश शिंदे, तसेच अनवडी ग्रामस्थ व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांना ओकीनावा शोतोकान कराटेचे मुख्य प्रशिक्षक श्री. अप्पा जाधव यांच्या तर्फे बेल्ट व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच सान्वी जाधव व आराध्या शिंदे या दोन विद्यार्थिनींना २०२५–२६ या शैक्षणिक वर्षातील वर्गातील उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल प्रशिक्षक, पालकवर्ग व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













