Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

दत्तात्रय घाडगे यांची महा.राज्य मराठी पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

दत्तात्रय घाडगे यांची महा.राज्य मराठी पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
Ashok Ithape
  • PublishedSeptember 15, 2025

सातारा l प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई तर्फे सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून दत्तात्रय कृष्णत घाडगे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य संघटक मा. संजयजी भोकरे, प्रदेशाध्यक्ष मा. गोविंद वाकडे व प्रदेश सरचिटणीस मा. विश्वासजी आरोटे यांच्या सूचनेनुसार ही निवड जाहीर करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत राहून विविध उपक्रम राबविल्याची दखल घेऊन त्यांची उपजिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पत्रकारांच्या हिताचे काम, संघटन मजबूत करणे व संघटनेच्या ध्येय–धोरणांचे अवलंबन करण्याच्या दृष्टिकोनातून ही निवड महत्त्वाची ठरणार आहे.

या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष प्रविण कांबळे यांनी अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नागठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पंचपोर, उपाध्यक्ष विजय घोरपडे, सचिव संदीप जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बांधवांनीही अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!