साप म्हणजे शत्रू नव्हे – मित्र !
![]()
जागतिक सर्प दिनानिमित्त पंचगणीमध्ये आंतरशालेय पोस्टर स्पर्धा
पंचगणी, दि. २४ जुलै : “साप निसर्गाचे रक्षक आहेत, त्यांचा सन्मान करा – नाश नव्हे!” या प्रभावी संदेशासह पंचगणीत जागतिक सर्प दिनानिमित्त (१६ जुलै) अॅनिमल रेस्क्यू टीम व सर आईनस्टाईन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय पोस्टर सादरीकरण स्पर्धा उत्साहात पार पडली.
पंचगणीतील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सापांविषयी असलेली भीती बाजूला सारून त्यांच्या निसर्गातील महत्त्वावर प्रकाश टाकणारी मनोज्ञ पोस्टर्स सादर केली. कलाकृतींमधून सर्पसंवर्धन, जैवविविधतेचे रक्षण आणि सहअस्तित्वाचा प्रभावी संदेश उमटला.
विजेतेपदाचे मानकरी:
गट अ (इयत्ता १० वीपर्यंत):
🥇 बिलीमोरिया हायस्कूल – प्रथम
🥈 विद्यानिकेतन हायस्कूल – द्वितीय
🥉 सेंट पीटर हायस्कूल – तृतीय
गट ब:
🥇 पंचगणी इंटरनॅशनल स्कूल – प्रथम
🥈 सेंट जोसेफ हायस्कूल – द्वितीय
🥉 रीड अँड राईज व सर आईनस्टाईन अकादमी – संयुक्त तृतीय
तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशंसा:
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राणिवैद्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले –
> “सापांविषयीची अज्ञानातून निर्माण झालेली भीती दूर करून योग्य माहिती पोहोचवणे हे काळाचे महत्त्वाचे भान आहे.”
तसेच तुषार आखाडे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले –
> “साप मारण्याऐवजी वाचवण्याची संस्कृती मुलांमध्ये रुजवणे ही मोठी जिंक आहे.”
विद्यार्थिनी तहरिमा शेख हिने अनुभव शेअर करताना सांगितले –
> “ही स्पर्धा आम्हाला फक्त चित्रकला नाही तर निसर्गाशी नवे नाते जोडून गेली.”
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिया भंडारी (अध्यक्ष), श्रुती चौधरी (सचिव), अबदा बगवान, पार्थ खंडके, मनोज भोसले व आर्यन कसुर्दे यांनी विशेष परिश्रम घेतले.
रेसक्यू टीम निहाल सर यांनी मुलांना संदेश दिला
“साप निसर्गाचे प्रहरी – त्यांना वाचवा, त्यांचे रक्षण करा!”
“भीती नाही, तर जागरूकता – हाच सर्पसंवर्धनाचा खरा मार्ग!”
अश्फाक सर म्हणाले
साप दिसल्यास घाबरू नका किंवा सापाला मारण्याचा प्रयत्न करू नका.
त्वरित सर्पमित्र/रेस्क्यू टीमला संपर्क करा.
सुरक्षित अंतर ठेवा आणि सापाला बाहेर जाण्यासाठी मोकळी वाट द्या.
“लक्षात ठेवा – साप निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहेत.”













