Thu, Jan 15, 2026
Media

श्री अरुण आडिवरेकर यांना राज्यस्तरीय कोकण विभागीय शि. म. परांजपे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

श्री अरुण आडिवरेकर यांना राज्यस्तरीय कोकण विभागीय शि. म. परांजपे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
Ashok Ithape
  • PublishedJuly 7, 2025

रत्नागिरी l प्रतिनिधी : श्री अरुण सुनील आडिवरेकर, गेली २३ वर्षे पत्रकारितेत काम करत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अवांतर लिखाणाची त्यांना आवड निर्माण झाली. दैनिक रत्नागिरी टाइम्समधून लिखाण प्रसिद्ध होऊ लागले आणि हळूहळू लिखाणाची त्यांना सवयच जडली. पुढे ते राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करू लागले. महाविद्यालयीन शिक्षण संपताच सन २००२ मध्ये पत्रकारितेत प्रवेश केला. सुरुवातीला पत्रकार मग उपसंपादक, जिल्हा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली. रत्नागिरी येथे दै.लोकमतमध्ये गेली १० वर्षे ते काम करत आहेत. सध्या वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम करत आहे. महाराष्ट्र शासनाचा सन २०२२चा राज्यस्तरीय कोकण विभागीय शि. म. परांजपे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशात ‘लोकमत’ चा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर कुटुंबाचा भक्कम पाठिंबा यामुळे हे यश मिळाले आहे.

जे करायचे ते मन लावून, स्वत:ला झोकून देवून, आणि सकारात्मक दृष्टी ठेवून करायचे ही त्यांची खासियत आहे. पत्रकार क्षेत्रातील एक निगर्वी, अत्यंत उत्साही, हसतमुख असलेले श्री आडिवरेकर हे शब्दश: एक अष्टपैलू व्यक्तीमत्व लाभलेले पत्रकार आहेत. आपल्या लेखनीच्या माध्यमातून अनेक दुर्लक्षित प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. आपल्या पेशाला कुठेही गालबोट न लावता, समाजाभिमुख लेखनी लाभलेले ते लक्षवेधी पत्रकार आहेत. स्वत: बरोबरच आपल्या सहका-यांकडून ही अपेक्षित काम करवून घेण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे आहे. उपेक्षित घटकांच्या व्यथा निपक्षपातीपणे मांडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या अथक परिश्रमाचे, उच्य वैचारिक भुमिकेचे व सडेतोड लेखनीचे या पुरस्कारामुळे सार्थक झाले आहे. त्यांना हा गौरवशाली पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!