Fri, Apr 17, 2026
शिक्षण

पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. इक्बाल शेख यांचा चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सन्मान

पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. इक्बाल शेख यांचा चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सन्मान
Ashok Ithape
  • PublishedJuly 6, 2025

पुणे, दि. ५ : पूना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, कॅम्प, पुणे या संस्थेचे प्राचार्य डॉ. इक्बाल शेख यांना राज्यस्तरावरील विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मा. चंद्रकांत दादा पाटील (मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण) यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम पुणे विद्यापीठात पार पडला.

डॉ. इक्बाल शेख यांना हा सन्मान ‘भक्तियोग-२०२५’ या राज्यस्तरीय उपक्रमात लीड कॉलेज म्हणून पूना कॉलेजने बजावलेल्या यशस्वी नेतृत्त्वाबद्दल देण्यात आला. दिनांक २१ जून २०२५ रोजी, पुण्यातील १० पालखी मार्गांवर पूना कॉलेजच्या मार्गदर्शनाखाली भक्तियोग उपक्रम राबविण्यात आला होता.

या उपक्रमात NSS स्वयंसेवक, NCC कॅडेट्स, BSD अधिकारी, NSS व NCC अधिकारी, समिती सदस्य, प्राध्यापकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग होता. सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक वारसा आणि युवकांचे नेतृत्व या मूल्यांचा समावेश असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांवर कौतुक झाले.

या यशाबद्दल अंजुमन खैरुल इस्लाम (AKI) संस्थेचे सचिव हानी अहमद फरीद, अध्यक्ष निसार शेख, CDC चेअरमन डॉ. हनीफ लकडावाला यांनी तसेच पूना कॉलेजमधील सर्व विभागप्रमुख आणि शिक्षकवर्गाने डॉ. शेख सरांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे कौतुक केले.

“डॉ. इक्बाल शेख यांचे नेतृत्व संस्थेसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे पूना कॉलेजने राज्यस्तरावर स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे,” असे गौरवोद्गार संस्थेच्या वरिष्ठांकडून व्यक्त करण्यात आले.

हा सन्मान म्हणजे संघशक्ती, नेतृत्व आणि सामाजिक सहभाग यांचे प्रतीक असून, पूना कॉलेजसाठी एक गौरवाची बाब ठरली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!