Mon, Mar 2, 2026
शिक्षण

किसन वीर महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९०.९७ टक्के

किसन वीर महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९०.९७ टक्के
Ashok Ithape
  • PublishedMay 8, 2025

वाई : बारावी बोर्ड परीक्षेत जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९०.९७. टक्के लागला आहे. यामध्ये १९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह व ७९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

कु. सायुरी उमेश सणस

कला शाखेचा निकाल ७४.१७ टक्के लागला असून, यामध्ये कु . सायुरी उमेश सणस हिने ९२.०० % गुण मिळवून प्रथम क्रमांक, श्री मयूर साळुंखे याने ७७.३३ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. भक्ती माने हिने ७६.१७ % गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.तिन्ही विभागात सर्वात जादा टक्के वारी कु सायुरी सणस हिने मिळविली आहे ‌.

कु. अर्पिता जोशी

वाणिज्य शाखेचा निकाल ९०.०३ % टक्के लागला असून, यामध्ये कु. अर्पिता जोशी हिने ९१.१७ % गुण मिळवून प्रथम क्रमांक, श्री. सुहास यादव याने ८४.५० % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. निकिता खुडे हिने ८२.३० % गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

कु. स्नेहल मानकुंबरे

विज्ञान शाखेचा निकाल : ९७.६३ % लागला असून यामध्ये कु. स्नेहल मानकुंबरे हिने ८७.५० % गुण मिळवून प्रथम क्रमांक कु. वेदिका शेवडे हिने ८३.५० % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. पूर्वा फणसे हिने ७९.३३ % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, प्रा. नारायण चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे, पर्यवेक्षक श्री. अर्जुन जाधव आदींनी कौतुक करुन अभिनंदन केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!