Mon, Mar 2, 2026
अध्यात्म

बावधन मधील प्रधान व राजा बैल जोडी ठरली संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाची सारथी

बावधन मधील प्रधान व राजा बैल जोडी ठरली संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाची सारथी
Ashok Ithape
  • PublishedMay 6, 2025

प्रधान व राजा बैलाच्या जोडीला पालखी रथाचा मान मिळाल्याने गणा बापू धन्य झाल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.

वाई : बावधन मधील प्रगतशील शेतकरी व बैलप्रेमी म्हणून प्रसिद्ध असलेले गणपत सखाराम कदम (गणा बापू ) यांनी घरी सांभाळलेली प्रधान व राजा या बैल जोडीला यंदाच्या संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा आषाढी वारी रथासाठी ही बैल जोडी निवडीचा बहुमान मिळाला आहे.

विवेक ज्ञानेश्वर घुंडरे पाटील यांनी गणा बापू कडून प्रधान व राजा ही बैल जोडी खरेदी केली असून याच बैल जोडीला 2025 यंदाच्या आषाढी वारीच्या पालखी सोहळा रथाचा मान मिळाला आहे.

जून 19 पासून संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान होईल या प्रस्थानात आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग असून आळंदी पुणे सासवड जेजुरी वाल्हे लोणंद तरडगाव फलटण बरड नातेपुते माळशिरस वेळापूर भेंडी शेगाव वाखरी व पंढरपूर असा आषाढी वारीचा पालखी सोहळा असून पालखी रथाला प्रधान व राजा ही बैल जोडी रथ ओढण्यासाठी बांधली जाईल.

संत ज्ञानेश्वर महाराज हे महान संत तेराव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेले त्यांचा जन्म पैठण जवळील आपेगाव येथे झाला त्यांचे वडील विठ्ठल पंत कुलकर्णी आई रुक्मिणी बाई थोरला भाऊ निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि बहीण मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराज अतिशय विद्वान होते त्यांना माऊली या नावाने ओळखत त्यांचा संप्रदाय नाथ वारकरी वैष्णव होता साहित्यरचनेत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ अभंग अमृतानुभव व ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला म्हणून ते संत शिरोमणी व महान संत ज्ञानी पुरुष होऊन गेले पालखी पाय वारी सोहळा आनंद वारी म्हणून भक्तजन वारीत सहभागी होतात.

हा वैष्णवांचा मेळा पाहण्यासाठी भारतातून तसेच परदेशातूनही लाखो वारकरी पायी वारीत सामील होऊन ज्ञानेश्वर माऊली तुकाराम च्या जयघोषाने पालखी सोहळा आदिक उत्साही व भक्तिमय वातावरणात रंगतो अशा महान संताच्या आषाढी वारी पालखी साठी बावधन येथील बैल प्रेमी गणपती सखाराम कदम यांनी आता 91 वर्षात पदार्पण केले आहे. गणा बापू यांना शेती व नामांकित बैल जोपासण्यासाठी छंद होता तो त्यांनी आज तागायत मोठ्या कष्टाने जिद्दीने चिकाटीने हौसेने आपले सारे आयुष्य बैलांसाठी वाहिले, अखेर तो आनंदाचा क्षण उजाडला संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारीसाठी त्यांनी जोपासलेल्या वाढवलेल्या प्रधान व राजा बैलाच्या जोडी ला पालखी रथाचा मान मिळाल्याने गणा बापू धन्य झाल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते

– दिलीप कांबळे, बावधन

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!