Mon, Mar 2, 2026
शिक्षण

ओरीगामी प्रशिक्षण शिबिरात वाईतील विद्यार्थ्यांचा सहभाग

ओरीगामी प्रशिक्षण शिबिरात वाईतील विद्यार्थ्यांचा सहभाग
Ashok Ithape
  • PublishedApril 30, 2025

वाई / प्रतिनिधी : येथील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी ओरीगामी प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेऊन संबंधित विषयाचे ज्ञान घेतले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ओरिगामी प्रशिक्षक प्रदीप नेवसे यांनी प्रशिक्षणाची जबाबदारी समर्थपने पार पाडली.

श्री कृष्णाबाई देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्या विशेष सहकार्याने संपन्न झालेल्या या ओरीगामी प्रशिक्षण कार्यशाळेत नगरपालिकेच्या शाळा क्रमांक सहा मधील 40 विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. तर महर्षी शिंदे हायस्कूलच्या 25 विद्यार्थी विद्यार्थिनींचा आणि गर्ल्स हायस्कूल वाई यांच्या 15 विद्यार्थिनींही या शिबिरात सहभाग घेतला होता.

सकाळी साडेसात वाजल्यापासून विविध शाळांतील 80 विद्यार्थी – विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत ओरीगामी कलेविषयी विशेष मार्गदर्शन घेतले. देवस्थान ट्रस्टचे प्रसाद कुलकर्णी यांनी संस्थेतर्फे सहभागी सर्व विद्यार्थ्यांना रंगीत कागद उपलब्ध करून दिले होते.

ओरीगामी कला खऱ्या अर्थाने मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देणारा कलाप्रकार आहे, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता वाढीलाही फायदा होतो, असे श्री. कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. तसेच अनेक पालकांनी या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कलाविषयक जडणघडण योग्य प्रकारे होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

वाई नगर परिषद शाळा क्रमांक ६ च्या मुख्याध्यापिका सौ सुजाता यादव,  महर्षी शिंदे हायस्कूल वाई श्री शिवाजी माने, गर्ल्स हायस्कूल वाई धेंडे सर, ओरिगामी प्रशिक्षक श्री. प्रदीप नेवसे या सर्वांचे श्री कृष्णाबाई देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!