Mon, Mar 2, 2026
यशोगाथा

भुईंजच्या अजिंक्य पिसाळ याची वायू सेनेत निवड

भुईंजच्या अजिंक्य पिसाळ याची वायू सेनेत निवड
Ashok Ithape
  • PublishedApril 26, 2025

NDA च्या प्रशिक्षण व अभ्यासक्रमासाठी पात्र ठरलेल्या अजिंक्यवर अभिनंदनाचा, कौतुकाचा वर्षाव.

भुईंज : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA येथे भारतीय वायू सेनेच्या फ्लाईंग ऑफिसर म्हणून स्पर्धापरीक्षा देऊन निवड झालेल्या अजिंक्य पिसाळ हा लहानपणापासूनच सायकलपटू असून त्याने देशभरात सायकल वरून प्रवास केला आहे. देशसेवा करण्यासाठी तो वायुसेनेत जाऊन लढाऊ विमानाचे नेतृत्व करणे हे त्याचे स्वप्न होते.

अजिंक्य पिसाळ हा गरवारे फायबर्स कँपनी चे प्रोडक्शन म्यानेजर संजय पिसाळ व वाई औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या प्रशिक्षिका सौ. नीता पिसाळ यांचा सुपुत्र असून जेष्ठ पत्रकार जयवंत पिसाळ यांचा पुतण्या आहे, त्याचे निवडीचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे, भुईंज येथे ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे व प्रेस क्लबचे वतीने त्याचा सत्कारसमारंभ होणार असल्याची माहिती रामदास जाधव, राहुल तांबोळी, विलास साळुंखे यांनी दिली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!