तोडफोड, पेटवापेटवीच्या राड्याने भुईंज हादरले.
भुईंज l प्रतिनिधी : भुईंज येथिल मुख्य नाक्यावरचं हायवेलगत वर्दळीच्या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने भुईंज ग्रामपंचायत सदस्य, भरत भोसले यांची क्रेटा कार फोडून पेट्रोल ओतून पेटवली. या घटनेपुर्वी काही वेळ आधी भरत भोसले आणि मयुर भोसले यांच्यात फिल्मीस्टाईल हाणामारी झाली होती त्यानंतर काही वेळाने घडलेल्या या प्रकारामुळे भुईंज परीसर हादरून गेला आहे.
भरत भोसले आणि मयुर भोसले या दोघांची भुईंज येथे जोरदार हाणामारी झाली होती या प्रकरणी तक्रार देण्यासाठी भरत भोसले भुईंज पोलिस ठाण्यात गेले होते. त्याच वेळी हायवेलगत कारखाना काँर्नर येथिल जाधवराव काँप्लेक्स मध्ये उभी असलेल्या गाडीच्या काचा फोडून आतमध्ये पेट्रोल ओतून काही आज्ञाताने गाडीपेटवल्याचे तेथे समजले.
तिथूनच भोसले आणि पोलिस फाटा घटनास्थळी दाखल झाले. किसनवीर कारखान्याच्या अग्नीशमन यंञणेला पाचारण करून आग विझवली.या वेळी बघ्यांची प्रचंड गर्दी घटनास्थळी झाली होती.भरत भोसले यांनी या बाबत दिलेल्या फिर्यादीत हे कृत्य मयुर भोसले व त्याच्या साथीदारांने कार फोडून गाडी पेटवल्याचे म्हटले आहे. दरम्यान भरत भोसले व मयुर भोसले यांच्यात या घटनेच्या आधी काहीतास जोरदार हाणामारी झाली होती.मयुर भोसले भरत भोसले याना वारंवार पैशांची मागणी करत असे त्यावरून ती हाणामारी झाली होती याच गोष्टीचा राग मनात धरून मयुर भोसले याने हे कृत्य केल्याचा आरोप भरत भोसले यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे. या घटनेत भरत भोसले याच्या क्रेटा गाडीची ३ते ४ लाख रूपयांचे नुकसान झाले असून या प्रकरणातील आरोपी मयुर भोसले याचा शोध सुरू आहे अशी माहीती सपोनि रमेश गर्जे यांनी पञकारांशी बोलताना दिली.
दरम्यान भुईंजमध्ये भररस्त्यावर वारंवार होणारया अशा घटनांमुळे भुईंज परीसर हादरून गेला आहे. या बाबत पोलिसांचा असे कृत्य करणारेंना धाक वाटत नाही. अशाप्रकारच्या तक्रारी दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. माध्यमांना तत्परतेने माहीती दिली जात नाही.













