Mon, Mar 2, 2026
क्राईम न्यूज

मुंबई सीमाशुल्क विभागाच्या कारवाईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी प्रवाशाकडून 7.85 कोटी रुपयांचे कोकेन जप्त

मुंबई सीमाशुल्क विभागाच्या कारवाईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळावर परदेशी प्रवाशाकडून 7.85 कोटी रुपयांचे कोकेन जप्त
Ashok Ithape
  • PublishedApril 14, 2025

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळावर 9 व 10 एप्रिल 2025 रोजी 785 ग्रॅम वजनाचे व सुमारे 7.85 कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले असून यासंदर्भात एका परदेशी प्रवाशाला अटक केली आहे. यासंदर्भात  गुन्हा नोंदवण्यात आला  आहे.

9 एप्रिल 2025 रोजी यूआर430 या विमानाने प्रवास करुन मुंबईत आलेल्या एका परदेशी प्रवाशाला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी संशयावरुन रोखले होते. चौकशी करताना हा प्रवासी अस्वस्थ व चिंतीत झाल्याचे जाणवले. पुढील चौकशीत व वैद्यकीय तपासणीत प्रवाशाने पिवळ्या रंगाच्या भरपूर गोळ्या गिळल्याचे आढळून आले. या गोळ्यांमध्ये कोकेन असल्याचा संशय असलेला पांढऱ्या रंगाचा चुरगाळलेला पदार्थ होता.

वैद्यकीय देखरेखीअंतर्गत 13 एप्रिल 2025 रोजी केलेल्या पंचनाम्यात हा पदार्थ 785 ग्रॅम वजनाचे कोकेन असल्याचे सीमाशुल्क अधिकाऱ्यांना आढळले. त्याची अंदाजे किंमत 7,85,00,000 रुपये इतकी आहे.  या प्रवाशाला एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत अटक करण्यात आली असून  पुढील तपास सुरू आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!