राहुल तांबोळी – नाम तो सुना ही होगा
साधीच पण थेट विषयाला हात घालणारी सोपी भाषा घेऊन आपला मुद्दा मांडण्याची वेगळी निसर्गदत्त हातोटी असलेला पत्रकार,लेखक आणि सर्जनशील व्यक्तिमत्व म्हणजे राहुल तांबोळी…!आपल्यातील असामान्य लेखन कौशल्याने आपल्या नावाला वेगळ्या उंचीवर नेणारा या अवलियाबद्दल अलीकडे एकच वाक्य कॉमन झालंय… राहुल तांबोळी…नाम तो सुना ही होगा!!!
भुईंज सारख्या संवेदनशील नेत्यांच्या गावात
‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं…’अशा शब्दांच्या सानिध्यात आलेला,पुस्तकांत अन माणसांत रमणारा हा युवक ऐन तरुणाईत पत्रकारितेत आला..त्यात रमला अन स्थिरावला देखील!सतत न्यायी भूमिका,लोकांच्या अडचणीत उभं राहण्याची परोपकारी वृत्ती अन निकराचा पाठपुरावा करण्याची जिद्द यामुळे राहुल तांबोळी हे नाव अल्पावधीत पत्रकारितेत नावाजल गेलं..
पत्रकार होण्याचं स्वप्न पाहिलेल्या आमच्या सारख्या नव्या पत्रकारांना उभ राहण्याचे बळ देण्यात जे पत्रकार कारणीभूत ठरले त्यात राहुल तांबोळी या नावाचा उल्लेख करावाच लागेल…!
एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात प्रचंड आदराची भावना असते.. पण ती व्यक्त करता येत नाही…आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ती संधी मला मिळतेय हे माझे भाग्यच!!एक पत्रकार म्हणून राहुलजी तुम्ही ग्रेट आहातच पण एक व्यक्ती म्हणून तुम्ही महान आहात!!
पत्रकारितेच्या पुढच्या तुम्ही चोखळलेल्या वाटेवर मला चालता येईल हा तुम्ही दाखवलेला माझ्यावरील तुमचा विश्वास खरा करून दाखवण्यासाठी मी निश्चित प्रयत्नशील राहीन! माझ्या आदरणीय व्यक्तींमध्ये वेगाने वरची जागा घेऊ पाहणाऱ्या राहुल सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
सचिन ननावरे,बावधन!!













