भुईंज ग्रा़मदैवता महालक्ष्मीचे दर्शन १९ दिवस बंद
![]()
भुईंज येथील महालक्ष्मी, वैभवलक्ष्मी मुर्ती वज्रलेप: प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहन कार्यक्रमाचे आयोजन.
पाचवड l प्रतिनिधी : भुईंज ता.वाई येथिल कृष्णानदीतीरी भाविकांचे श्रध्दास्थान असलेले ऐतिहासिक सुप्रसिध्द श्री महालक्ष्मी मंदीरातील महालक्ष्मीच्या मुळ मूर्तीवर ७ मार्च पासून रासायनिक संरक्षणाच्या प्रक्रियेला प्रारंभ करणार असून ही प्रक्रिया सलग एकोणवीस दिवस सुरू राहणार असून या दरम्यान विविध धार्मिक विधी होणार नाहीत.२५ मार्चपर्यंत महालक्ष्मीचे दर्शन रासायनिक संवर्धनाच्या(वज्रलेप)कामामुळे भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहे.दीर्घकाळासाठी देवीचे दर्शन बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भुईंजचे ऐतिहासिक महालक्ष्मीचे मंदिर अतिशय प्राचीन असून वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेले या पुरातन मंदिराचा पुरातत्त्व खात्याच्या संरक्षित वास्तूमध्ये लवकरच समावेश करण्यात येणार आहे अशी माहीती महालक्ष्मी देवस्थान कमिटीने दिली.या ठिकाणी असलेली महालक्ष्मीची पाषाणमूर्ती आहे. ही मूर्ती तीन फूट उंचीची आहे. या मूर्तीवर मागील काहीवर्षापुर्वी वज्रलेप करण्यात आला होता. महालक्ष्मीच्या मूर्तीवर शेकडो वर्षांपूर्वीपासून पंचामृताचा अभिषेक घातला जात आहे.मूर्तीवर सततच्या अभिषेकातील रासायनिक घटकांमुळे परिणाम झाल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या मूर्तीवर दिवसातून फक्त एकदाच अभिषेक घातला जातो. पण तरीही या मूर्तीची झीज होऊ लागली आहे. ही झीज थांबवण्यासाठी मूर्तीवर रासायनिक संवर्धन करण्याचा निर्णय झाला आहे.
वज्रलेपाची सर्व प्रक्रिया २५मार्चपर्यंत पूर्ण झाल्यानंतर २६मार्चला मुर्तीची नव्याने धार्मिकविधी करून पूर्ववत दर्शन व्यवस्था सुरू होईल. दरम्यानच्या काळात मूळ मूर्तीसमोर पडदा राहणार असून मंदिरातील दोन नंबरच्या गाभारयात उंबऱ्याजवळ उत्सवमूर्ती आणि प्राणतत्त्व कलश दर्शनासाठी ठेवला जाईल. मधल्या गाभारयाच्या उंबऱ्यापासून दर्शनाची व्यवस्था केली आहे. या काळात भाविकांचे कोणतेही अभिषेक होणार नाहीत.अशी माहीती महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट व भंडारा उत्सव कमिटीेने दिली.













