Mon, Mar 2, 2026
शिक्षण

दहावी इंग्रजी विषयाचा पेपर शांततेत संपन्न

दहावी इंग्रजी विषयाचा पेपर शांततेत संपन्न
Ashok Ithape
  • PublishedMarch 1, 2025

पाचगणी l प्रतिनिधी : आज दिनांक १ मार्च २०२५ रोजी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाचा पेपर शांततेत पार पडला.

महात्मा फुले विद्यामंदिर, पाचगणी येथे केंद्र क्रमांक १२०२ वर परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली. परीक्षेसाठी श्री महेश पालकर, संचालक, योजना शिक्षण संचालनालय, पुणे, तसेच गटशिक्षणाधिकारी महाबळेश्वर श्री आनंद पळसे सर यांनी भेट देऊन पाहणी केली.

परीक्षा केंद्राचे संचालन केंद्र संचालक श्री रामचंद्र गुंडोपंत वर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच उपकेंद्र संचालक श्री कांबळे P.A. यांनी सहकार्य केले. परीक्षेच्या नियोजनासाठी बिल्डिंग कंडक्टर श्री बोंबले सर आणि श्री प्रभाळे सर (इंग्रजी माध्यम) यांनी योग्य ती व्यवस्था केली.

परीक्षा सुरळीत व नियमानुसार पार पडली असून कोणत्याही अनुचित प्रकाराची नोंद झालेली नाही.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!