Mon, Mar 2, 2026
महाराष्ट्र

सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयास राज्यात द्वितीय क्रमांक

सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयास राज्यात द्वितीय क्रमांक
Ashok Ithape
  • PublishedFebruary 27, 2025

सातारा : महाराष्ट्र राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / आयुक्त/ संचालक, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलीस महानिरीक्षक / पोलीस उप महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीचे -कार्यालयांची संकेतस्थळे, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी, कृत्रीम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर (AI), नाविन्यपुर्ण उपक्रम, इत्यादी निकषांच्या आधारे मुल्यमापन करण्यात आले.या अंतिरिम प्रगतीच्या मुल्यमापनामध्ये राज्यातील सर्व ३५ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामधून सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयास राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

सदरच्या उल्लेखनीय कामगिरीकरीता पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे कुशल नेतृत्वाखाली व योग्य मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक समीर शेख यांना अभिनंदन पत्र प्रदान करुन गौरव करण्यात आला.

सातारा जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी बजावलेल्या उल्लेखनिय कामगिरीमुळे सातारा जिल्हा पोलीस दलास हे उत्तुंग यश मिळाले आहे व भविष्यात ही सातारा जिल्हा पोलीस दलाकडून उल्लेखनीय कामगिरीचा आलेख चढता राहील असे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्यांचे मत व्यक्त केले.पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा पोलीस दलाने केलेल्या गौरवपुर्ण कामगिरीबद्दल सह्याद्रिी अतिथीगृह येथे उपस्थित सर्व मान्यवरांनी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांचे अभिनंदन केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!