दिवंगत सीताबाई गायकवाड यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन
सातारा l प्रतिनिधी : बीव्हीजी इंडियाचे संस्थापक प्रसिद्ध उद्योगपती हणमंतराव गायकवाड यांच्या मातोश्री सीताबाई गायकवाड यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम आज सकाळी ८:३० वा. श्री क्षेत्र देवाची आळंदी येथील इंद्रायणी नदीकाठी होणार आहे. या प्रसंगी आळंदी देवस्थानाचे विश्वस्त मंडळ उपस्थित राहणार आहे.
पुणे महानगर पालिकेच्या शिक्षण क्षेत्रात सीताबाईंनी महत्वपूर्ण योगदान दिले होते. पतीच्या निधनानंतर अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत मोठा मुलगा हणमंतराव यांना अभियांत्रिकी विभागाचे शिक्षण दिले, त्याचबरोबर लहान मुलगा दत्तात्रेय यांना वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर बनवले. कुटूंब स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी अध्यात्मिक क्षेत्राला वाहून गेले होते. पिंपळे गुरव व सांगवी भागात महिला भजनी मंडळाद्वारे त्यांनी अनेक सुधारणावादी उपक्रम राबवले होते. जेष्ठ नागरिकांना स्व:खर्चाने अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचे दर्शन घडवले होते.
वारकरी विद्यार्थ्यांना प्रसाद भोजन
शोकसभेनंतर आळंदी परिसरातील १०० वारकरी विद्यार्थ्यांना प्रसाद भोजन देण्यात येणार आहे. गायकवाड कुटूंबियाच्या वतीने देवस्थानाला गाय वासरु भेट देण्यात येणार आहे.













