Thu, Jan 15, 2026
प्रशासन

मांढरदेव यात्रेत प्लास्टिक पिशवी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई 8 ते 10 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

मांढरदेव यात्रेत प्लास्टिक पिशवी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई 8 ते 10 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
Ashok Ithape
  • PublishedJanuary 16, 2025

वाई: संपूर्ण जगाला भेडसावणारी प्लास्टिक कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे . देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ व सुंदर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन हि महत्वाकांक्षी योजना संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे . यामध्ये ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान उंचविण्याकरिता विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सातारा जिल्ह्यात राबविण्यात येतात.

सातारा जिल्हा परिषदेच्या मा .मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी कचरामुक्त सातारा जिल्हा करण्याचा ध्यास घेतलेला असून सातारा जिल्ह्यात एकल प्लास्टिक वापरा वर बंदी करण्यात आलेली असून सार्वजनिक ठिकाणी एकल प्लास्टिक वारणाऱ्यांवर कारवाई करण्याचे फलक लावण्यात आलेले आहेत तसेच प्लास्टिक व्यवस्थापन करण्याकरिता गावस्तरावर प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात आलेली आहेत.

त्याच धरतीवर मांढरदेव यात्रे मध्ये प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या व विक्री करणाऱ्या व्यावसायिक व विक्रेत्यांवर वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या मार्गर्दर्शनाखाली धडक मोहीम राबविण्यात आली स्वच्छता पथकामार्फत सर्व दुकानदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करून 8 ते 10 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे श्री . रोहित जाधव तालुका सल्लागार पंचायत समिती वाई, श्री संतोष अनगळ, श्री शहाजी बोभाटे ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!