Mon, Mar 2, 2026
शिक्षण

अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश प्रकीया सुरु

अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश प्रकीया सुरु
Ashok Ithape
  • PublishedDecember 27, 2024

सातारा दि. 27: सातारा येथील सैनिक स्कूल येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या इयत्ता सहावी व नववीमध्ये प्रवेश घेण्यासाठी सैनिक स्कूल प्रवेश परिक्षेचे अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे, अशी माहिती सातारा सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन के श्रीनिवासन यांनी दिली.

                दि.24 डिसेंबर पासून प्रवेश परिक्षेचे अर्ज भरणे सुरु झाले आहे. इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी मुला-मुलींना सुवर्णसंधी असून याकरीता विद्यार्थ्याचे 31 मार्च 2025 पर्यंत 10 ते 12 वर्ष असावे.  तर इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचे 31 मार्च 2025 पर्यंत 13 ते 15 या दरम्यान वय असावे.   सैनिक स्कूल प्रवेश परिक्षेचे अर्ज भरण्याची मुदत 13 जानेवारी पर्यंत सायं 5 वाजेपर्यंत असून प्रवेश परिक्षेचे अर्ज ऑनलाईन भरणे अत्यंत जरुरीचे आहे. प्रवेश प्रक्रीयेबाबत अधिक माहिती साठी https://exams.nta.ac.in/AISSEE  या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही प्राचार्य के श्रीनिवासन यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!