हिवाळ्यावर मात करण्यासाठी राजवैद्य मेडिकल्समध्ये औषधे व सौंदर्यप्रसाधनांची मोठी व्हरायटी उपलब्ध
![]()
दर्जेदार व नामांकित कंपन्यांच्या विंटर कलेक्शनचा लाभ घेण्याचे रणजित भोसले यांचे आवाहन

वाई / प्रतिनिधी : भुईंज येथील राजवैद्य मेडिकल स्टोअर्स हे अनेक नागरिकांचे हक्काचे औषधघर आहे. वीस वर्षांपासून अधिक काळ रुग्णसेवेचा वसा जपलेल्या या मेडिकल स्टोअर्सच्या शाखा वाई व खंडाळा येथेही सुरू झाल्या असून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या औषधी विक्री केंद्राचा नावलौकिक दिवसें दिवस चांगलाच वाढू लागला आहे. सध्या सुरू असलेल्या हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंडीमुळे उद्भवणाऱ्या विकारांवरील औषधे व नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार सौंदर्य प्रसादनांची मोठी व्हरायटी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती संचालक रणजित भोसले यांनी दिली आहे.

भुईंजमधील राजेभोसले या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या घराण्यातील रणजित भोसले यांनी या क्षेत्रातील कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना मोठ्या आत्मविश्वासाने हा या व्यवसायात पदार्पण केले आणि अविश्रांत कष्ट व ग्राहकांची साथ या बळावर यशस्वीताही प्राप्त केली.
राजवैद्य मेडिकल स्टोअर्समध्ये सर्वच ग्राहकांना विनम्र आणि तत्पर सेवा दिली जाते. ग्राहकांना समजून घेत औषधे कशी घ्यावीत, हे समजावून सांगत येथे औषधे दिली जातात. “अगदी डोळे झाकून औषधे न्यावीत, तर राजवैद्य मेडिकल मधूनच” असा अनेक ग्राहकांचा, अबालवृद्धांचा विश्वास या मेडिकल स्टोअर्सने संपादन केला आहे. भुईंजबरोबरच वाई आणि खंडाळा येथेही या मेडिकलच्या शाखा आहेत.

उत्तम सेवा, अचूक मार्गदर्शन आणि समयसुचकतेनुसार ग्राहकांना समजून घेण्याची वृत्ती यामुळे राजवैद्य मेडिकल ग्राहकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहे.
ऍलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी आदी विविध उपचार पद्धतींची अनेक नामवंत कंपन्यांची दर्जेदार आणि खात्रीशीर औषधे मिळण्याचे विश्वासाचे ठिकाण म्हणून हे औषध विक्री केंद्र प्रसिद्ध आहे.
मुळातच आजारपणामुळे त्रासलेल्या रुग्णांना औषध विक्रेत्यांकडून योग्य ते मार्गदर्शन आणि आपुलकीची सेवा मिळाली म्हणजे त्यांचा निम्मा आजार बरा होतो. अगदी त्याच धर्तीवर भुईंजसह वाई व खंडाळा येथील शाखांमध्ये राजवैद्य मेडिकल्सतर्फे ग्राहकांना आपुलकीच्या भावनेतून विनम्र सेवा दिली जाते.

आपल्या वाडवडिलांनी घालून दिलेले सामाजिक बांधिलकीचे संस्कार जपत मोठ्या सचोटीने रणजीत भोसले यांनी हा व्यवसाय चालवला आहे. केवळ जादा कमिशन मिळते म्हणून कोणत्याही कंपनीचे औषध ग्राहकाच्या गळ्यात न मारता ग्राहकाला उपयोगी ठरेल आणि त्याच्या खिशालाही परवडेल हा उद्देश ठेवून नामवंत कंपन्यांची औषधे देण्यास त्यांनी प्राधान्य दिले. डॉक्टरांचा सल्ला आणि रुग्णाचा फायदा या दोन्हीचा समन्वय साधून औषध विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अर्थात त्यामुळे डॉक्टर आणि ग्राहक या दोन्हींमध्ये या मेडिकल स्टोअर्सविषयी आपुलकीची भावना आहे.

सध्या सुरू असलेल्या हिवाळा ऋतुच्या पार्श्वभूमीवर राजवैद्य मेडिकल्स मध्ये व्हॅसलीन, पेट्रोलियम जेली, सौंदर्यप्रसाधने तसेच हिवाळ्यामुळे उद्भवणाऱ्या श्वासाच्या आजारांवरील औषधांची मोठी व्हरायटी उपलब्ध करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नियमित आणि नव्याने येणाऱ्या ग्राहकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













