राजभवन येथील चंद्रशेखर साखरे शासकीय सेवेतून निवृत्त
सातारा दि. 4 : महाबळेश्वर येथील राजभवन मधील कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असणारे चंद्रशेखर मारुती साखरे वयोमनानुसार दि. 30 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त झाले. त्यांना सत्पनीक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या निरोप समारंभाला पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागकाचे उप अभियंता श्री निशिकांत पायाळ, शाखाधिकारी अमिता पाटील थोरात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी तसेच राजवनमधील तसेच नगरपालीका, एमटीडीसी येथील अधिकारी व, कर्मचारी उपस्थित होते.
श्री. साखरे यांनी राजभवन येथे कार्यरत असताना राजभवनाची चांगल्या प्रकारे देखभाल व दुरुस्ती केली. त्यांच्या मनमेळावी स्वभावामुळे त्यांना कोणत्याही काम अडचणी आली नाही. राजभवनात राहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करीत असे.
त्यांच्या कारकीर्दीत अनेक व्हीआयपी राजभवनात राहण्यासाठी येत होते. त्यावेळी त्यांनी चागल्या पद्धतीने आपली सेवा बजावली आहे. आयुष्य आरोग्यदायी, सुख समाधानाचे जावे अशा शुभेच्छा सेवानिवृत्त समारोपाप्रसंगी उपस्थितांनी दिल्या.













