Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Ashok Ithape
  • PublishedDecember 2, 2024
सातारा दि. 2 : किल्ले प्रतापगड येथे रविवार दि. 8 डिसेंबर  रोजी   शिवप्रताप दिन  मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे. याचे सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय ‍शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्याबाबत आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे-पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
  प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठीच्या आराखड्याचे थ्रीडी मॉडेल तयार करावे. त्याचबरोबर किल्ल्याची माहितीही याबरोबर देण्यात यावी. तसेच किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचे काम सुरु आहे. या कामांच्या माध्यमातून प्रतापगड परिसरात देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती पर्यटकांना देण्यात यावी.
किल्ले प्रतापगडावर गडावर विद्युत रोषाणई करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी   श्री. डुडी म्हणाले, किल्ले प्रतापगडाची संपूर्ण स्वच्छता करावी. ऐतिहासिक मर्दानी खेळांचे, पोवाड्यांचे आयोजन करावे. त्याचबरोबर बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांसाठी एस. टी. महामंडळाने बसेसची सोय करावी. त्याच बरोबर येणाऱ्या पर्यटकांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करावी. शिवप्रताप दिनाचे नियोजन करत असताना विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम करावे, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!