Mon, Mar 2, 2026
कृषी वार्ता

कराड येथील यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला प्रशासनाचे सहकार्य राहील – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

कराड येथील यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी  प्रदर्शनाला प्रशासनाचे सहकार्य राहील – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Ashok Ithape
  • PublishedDecember 2, 2024
सातारा, दि.2  :-  कराड येथील शेती उत्पन्न बाजार समिती आवारात यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी  प्रदर्शनाचे शेतकऱ्यांना याचा लाभ होईल या दृष्टीने चांगल्या पद्धतीने आयोजन करावे. या प्रदर्शनाला प्रशासनाचे सहकार्य राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे या संबंधी जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी समिर पवार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, संचालक नितीन ढापरे, राजेंद्र चव्हाण, विजयकुमार कदम आदी उपस्थित होते.
कृषी प्रदर्शनामध्ये सेंद्रीय शेतीबाबत  मोठ्या प्रमाणात जनजनगृती करावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, विविध कृषी उत्पादनावर आधारित विविध गावांमध्ये ठराविकच उत्पादन घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून. याबाबतही प्रदर्शनामध्ये जनजागृती करावी. प्रदर्शनामध्ये सेंद्रीय कृषी मालाचे जास्तीत जास्त स्टॉल उभे करुन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी यावेळी सांगितले.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!