Fri, Apr 17, 2026
क्रीडा

महाराष्ट्र राज्य कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत जपान कराटे असोसिएशन चे यश

महाराष्ट्र राज्य कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत जपान कराटे असोसिएशन चे यश
Ashok Ithape
  • PublishedDecember 2, 2024

जपान कराटे असोसिएशन इंडिया च्या वतीने घेण्यात आलेल्या 41 व्या महाराष्ट्र राज्य कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 या दिनांक 1 डिसेंबर 2024 गार्सिया कॉलेज वसई (मुंबई) येथे पार पडल्या.

या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये कराड येथील शिवराज माने या विद्यार्थ्याने प्रकार कातामध्ये रौप्य पदक व कुमितेमध्ये रौप्य पदक मिळवले हा खेळाडू संगम हेल्थ क्लब मध्ये शिकत होता याला मार्गदर्शन वीरेंद्र परदेशी यांचे मिळाले याने खुल्या वयोगटात महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक मिळवित व रौप्य पदकाचा मानकरी ठरला.

त्याची निवड राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी झालेली आहे या आधी सातारा येथे झालेल्या कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये देखील त्याने दोन सुवर्णपदके पटकावली होती यावेळी देखील त्याने आपल्या यशाचा सुवर्णमय आलेख चढता राखला आहे या कामगिरीबद्दल त्याचे भरभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत त्याच्या या कामगिरीचे सर्व स्तरावरून विशेष कौतुक होत आहे

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!