Sat, Apr 18, 2026
शिक्षण

राजेश अभ्यासिकेस राजू पवार यांच्याकडून ग्रंथसंपदा भेट

राजेश अभ्यासिकेस राजू पवार यांच्याकडून ग्रंथसंपदा भेट
Ashok Ithape
  • PublishedDecember 2, 2024

भुईंज : तिरंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयएफएस राजेश स्वामी अभ्यासिकेने ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षेची वाट चालण्यासाठी भक्कम व्यासपीठ दिले आहे, असे प्रतिपादन उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक प्रकाश पवार यांनी पाचवड, ता. वाई येथे केले.

वाई येथील रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिट्यूटचे सेवानिवृत्त कर्मचारी राजू पवार यांनी या अभ्यासिकेला मौल्यवान ग्रंथ संपदा भेट दिली. त्या प्रसंगी ते बोलत होते. राजू पवार यांनी, ग्रामीण भागात देखील अशा प्रकारची सर्व सोयींनी परिपूर्ण अभ्यासिका असल्याने त्याचा लाभ युवकांना होत असल्याचा आनंद व्यक्त केला.

अभ्यासिकेच्या व्यवस्थापिका शिल्पा पवार यांनी, या अभ्यासिकेत प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी प्रतीक्षा यादीवर असल्याचे सांगून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करता यावा याकरता विद्यार्थ्यांच्या मागणीवरून वेळ वाढवल्याचे सांगितले.

यावेळी प्राचार्या वनिता पवार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, उत्कर्षचे वसुली अधिकारी आनंद पवार, सीमा सुरक्षा दलाचे जवान अक्षय पवार उपस्थित होते. तिरंगा संस्थेच्या वतीने राजू पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!