Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

रुग्णालयातून डायरेक्ट मतदान केंद्रावर

रुग्णालयातून डायरेक्ट मतदान केंद्रावर
Ashok Ithape
  • PublishedNovember 20, 2024

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )

सातारा येथील सौ. रूपाली नितीन भोसले ह्या अल्पशा आजारामुळे गेले आठ दिवस साताऱ्यातीलच एका खासगी रुग्णालयात ऍडमिट होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांनी त्यांचे पती व अजिंक्यतारा कारखान्याचे माजी कामगार संचालक नितीन भोसले यांच्याकडे आज मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावण्याचा हट्ट धरला.

नितीन भोसले यांनी त्यांना व्हील चेअरवर बसवून वाहनातून हत्तीखाना शाळा येथील मतदान केंद्रावर आणले. तेथे सौ. रूपाली भोसले यांनी आजारपणात आपल्या मतदानाचे कर्तव्य तर बजावलेच मात्र कोणत्याही परिस्थितीत सर्वानी आपल्या मतदानाचा हक्क बाजवावा असा मोलाचा संदेशही दिला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!