Mon, Mar 2, 2026
राजकीय बातमीपत्र सातारा जिल्हा

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
Ashok Ithape
  • PublishedNovember 19, 2024

आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

सातारा / प्रतिनिधी : जिल्हयातील आठही विधानसभा मतदारसंघातील येथे बुधवारी (दि. 20) होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवरील सर्व तयारी पूर्ण झाली असून शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. सेक्टर ऑफीसर 436, केंद्राध्यक्ष 3,956 व इतर कर्मचारी 11,869 असे एकूण 16,261 कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आल्याचे सोमवारी श्री. डूडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोमवारी संध्याकाळी पाच वाजता निवडणुकीसाठीचा प्रचार संपुष्टात आला आहे. त्यामुळे या मुदतीनंतर आचासंहिता भंग होईल, अशा प्रकारचे कोणतेही गैरकृत्य कोणाकडूनही घडल्यास संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करणेत येईल, असे सांगून जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की, निवडणूक आचारसंहीता भंग होण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील भागात विशेष पथके नेमणेत आलेली आहेत. त्यानुसार cVIGIL या ॲपवर आजपर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण 107 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सर्व तक्रारी निकाली काढल्या आहेत. तसेच 1950 या नंबरवर एकूण 11 तक्रारी दाखल झाल्या असून सद्यस्थितीत त्या सुद्धा सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर आचारसंहिता काळात एकूण 11 FIR दाखल झालेले आहे. तर आचारसंहिता भंगविषयक प्राप्त तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करणेबाबत सर्व संबंधितांना सूचना दिल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

चेक पोस्ट

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात दारु, पैशाचा गैरवापर व मतदारांवर दबाब तंत्राचा वापर करणाऱ्या उमेदवार, व्यक्तीवर कारवाई करणेसाठी चेक पोस्ट तयार करण्यात आले आहेत. तेथे नियुक्त केलेले कर्मचारी व्यवस्थीत काम करत आहेत किंवा नाही? तसेच एफ.एफ.टी व एस.एस.टी पथकात नेमलेले कर्मचारी व्यवस्थित कामकाज करीत आहे किवा नाही? यांची तपासणी करणेबाबत व सर्व चेक पोस्टला भेटी देवून आचारसंहीतेच्या भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या सर्व निवडणुक निर्णय अधिकारी व संबंधित पोलीस अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. कोणीही लोकप्रतिनिधी अगर राजकीय पदाधिकारी शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना दबाव आणत असतील तर संबंधितांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचेशी याबाबत तात्काळ संपर्क साधणेबाबत निर्देश दिल्याची माहितीही श्री. डूडी यांनी यावेळी दिली.

Election Seizure Mangment System
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्हयात Seizure Mangment अंतर्गत विधानसभानिहाय कारवाई करणेत आलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 13 कोटी 11 लाख रुपये कारवाईत जप्त करण्यात आले आहेत.

कायदा व सुव्यवस्था-
निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी 3,097 पोलिस कॉन्टेबल तसेच 2940 होमगार्ड यांची नेमणूक करणेत आली आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या आठ कंपनी व राज्य राखीव दलाची एक कंपनी यांची नेमणूक केलेली आहे.

मतदान केंद्रांवर पुरेसा कर्मचारी वर्ग पुरविणेत येत असून यामध्ये सेक्टर ऑफीसर 436, केंद्राध्यक्ष 3,956 व इतर कर्मचारी 11,869 असे एकूण 16,261 कर्मचारी यांची नेमणूक करणेत आलेली आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करु नये, अशी बाब निदर्शनास आल्यास संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेवर कडक कारवाई करण्यात येईल.

मतदान केंद्रावर स्वच्छता अभियान राबविणेबाबत सर्व निवडणुक अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या मतदान केंद्रामध्ये स्वच्छता अभियान राबविणेबाबत कार्यवाही करावी अशा सूचनाही दिल्या आहेत.

गृहमतदान
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नोंदणी झालेले वय वर्ष 85 च्या वरील एकूण 1,914 मतदार असून त्यापैकी 1,787 मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!