Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

वाईतील खवय्यांसाठी लै भारी ऑफर!

वाईतील खवय्यांसाठी लै भारी ऑफर!
Ashok Ithape
  • PublishedNovember 19, 2024

मतदान केल्याची बोटाची शाई दाखवा आणि भिलारेज स्वीट अँड फरसाण मध्ये समोसा आणि जिलेबीवर सूट मिळवा!

वाई : महाराष्ट्रात एकीकडे विधानसभेची रणधुमाळी सुरु असून सर्वच पक्षांचा आता प्रचार संपला आहे. त्यातच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगासोबतच सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. त्यातच वाई येथील प्रसिद्ध अशा भिलारेज स्वीट अँड फरसाण या स्वीटमार्टमध्ये मतदानाचा हक्क बजावून आलेल्या ग्राहकांसाठी समोसा आणि जिलेबीवर सूट अशी खास ऑफरच लावली आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोग, प्रशासनासह अनेक व्यापारी संघटना पुढे आल्या आहेत. त्या अनुषंगाने ग्राहकांना आकर्षक सवलतीच्या ऑफर दिल्या जात आहेत.

वाईतील भिलारे प्लाझा, धर्मपुरी पेठ वाई येथील भिलारेज स्वीट अँड फरसाण या स्वीटमार्ट मध्ये, भिलारे बंधूंनी मतदानचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणाऱ्या ग्राहकांसाठी अठरा रुपयांचा समोसा 12 रुपयांमध्ये तर वीस रुपयांची 100 ग्रॅम जिलेबी फक्त 10 रुपयांमध्ये अशी खास ऑफर लावली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!