Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

लै भारी ऑफर!

लै भारी ऑफर!
Ashok Ithape
  • PublishedNovember 19, 2024

मतदान केल्याची बोटाची शाई दाखवा अन् रविवार पेठ येथील मेकओव्हर ब्युटीपार्लरमध्ये सूट मिळवा!

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )

महाराष्ट्रात एकीकडे विधानसभेची रणधुमाळी सुरु असून सर्वच पक्षांचा आता प्रचार संपला आहे. त्यातच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगासोबतच सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. त्यातच सातारा येथील मेक ओव्हर ब्युटी पार्लरच्या सौ. श्रुती अजिंक्य महाबळेश्वरकर

या पुढे आल्या आहेत

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोग, प्रशासनासह अनेक व्यापारी संघटना पुढे आल्या आहेत. त्या अनुषंगाने ग्राहकांना आकर्षक सवलतीच्या ऑफर दिल्या जात आहेत.

साताऱ्यातील केशव प्लाझा, पंताचा गोट,पावन मारुती मंदिर पाठीमागिल, अमर सायकल मार्ट जवळ गीते बिल्डिंग समोर असलेल्या मेक ओव्हर ब्युटी सलूनच्या सौ.श्रुती अजिंक्य महाबळेश्वरकर यांनी मतदानचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणाऱ्या महिलांसाठी 99 रुपयात कोणत्याही हेअर कटची खास ऑफर दिली आहे.
संपर्क – 7058123632

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!