वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट विद्यमान आमदार मकरंद पाटलांच टेन्शन वाढलं
![]()
जेष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे नातू ईशान भोसले अपक्ष विधानसभा लढवणार
भुईंज l प्रतिनिधी: समाजकारण, राजकारण करत असताना आजोबा मा. खा. स्वर्गीय प्रतापराव भोसले आणि मा. आमदार किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले यांच्या जीवावर नेहमीच पक्ष वाढवणे व बळकटी साठी मनापासून प्रयत्न केले आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा करण्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून नेहमी रात्रंदिवस राबलो आहे. काही कारणाने मला राजकारणातून संपवण्याचे काम केले. मात्र, वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी स्वाभिमानी जनता आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर यावेळी विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याचे ईशान गजानन भोसले यांनी सांगितले.
भुईज ता. वाई येथे महालक्ष्मी मंदिर परिसरात कार्यकर्त्यांच्या हट्टपायी झालेल्या सभेमध्ये त्यांनी हे व्यक्तव केले. एकीकडे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांचा विधानसभा मतदारसंघात असलेला जनसंपर्क व विकासासाठी झंजावात या निवडणुकीत मोठे आव्हान उभे करणारा ठरू शकतो त्यामुळे यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष ग्रामविकास मंत्री माजी खासदार प्रतापराव भोसले, माजी आमदार मदन दादा भोसले किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदन दादा भोसले यांचे पुतणे ईशान भोसले यावेळी अपक्ष विधानसभा निवडणुक लढत असल्याने यावेळी या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होणार असे चिन्ह दिसू लागले आहेत.

सध्या विधानसभा निवडणुकीत वारी जोमाने वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी जोरदार मोर्चे बांधणे सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने येणार आहेत. मात्र निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यां विरुद्ध विविध मुद्द्यावरून युद्ध सुरू आहे. दरम्यान वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष ग्रामविकास मंत्री खासदार प्रतापराव भोसले यांचे नातू ईशान गजानन भोसले यांनी अपक्ष लढण्याची वेगळी चूल मांडल्याने या विधानसभा मतदारसंघात नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातून ईशान भोसले अपक्ष निवडणूक लढणार असून येत्या 28 ऑक्टोबर रोजी सोमवारी वाई येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील लढत मोठी चुरशीची होण्याची शक्यता नाकारली जात नाही.
गेले काही दिवसापासून भोसले कुटुंबीयांकडून निवडणूक कोण लढवणार याबाबत तर्कवितर्क मतदारसंघांमध्ये सुरू होते. अखेर युवा नेते गजानन भोसले यांचे सुपुत्र ईशान भोसले हे अपक्ष निवडणूक लढणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे . त्यामुळे येत्या सोमवारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विधानसभेचा अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.को
कोण आहेत ईशान भोसले
ईशान भोसले हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ग्रामविकास मंत्री, माजी खासदार, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे नातू व वाई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनदादा भोसले यांचे पुतणे आहेत. त्यांनी आजपर्यंत विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध सार्वजनिक कार्यक्रमात योगदान दिले आहे गेल्या दहा वर्षापासून त्यांनी वाई मतदार संघामध्ये आपल्या कार्याची झलक दाखवून जनतेत नावलौकिक कमावले आहे.













