Sat, Nov 28, 2026
सामाजिक

समाजासाठी निस्पृह व निर्भिडपणे काम करणा-यांचा गौरव होणे हे सृजनशील समाजाचे लक्षण ; माजी मंत्री महादेव जानकर

समाजासाठी निस्पृह व निर्भिडपणे काम करणा-यांचा गौरव होणे हे सृजनशील समाजाचे लक्षण ; माजी मंत्री महादेव जानकर
Ashok Ithape
  • PublishedNovember 2, 2026

पंढरपूर येथे ईगल फौंडेशनचा राष्ट्रीय गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहात पार, खा.रामराव वडकुते, दै.आधुनिक केसरीचे संपादक डॉ.प्रभू गोरे,श्री शिवराज काटकर यांना विशेष मानपत्र प्रदान

ईश्वरपूर : ईगल फौंडेशनचे काम दिशादर्शक असुन समाजातील कर्तृत्वसंपन्न व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे काम ही संस्था सातत्याने करत आहे.असे प्रतिपादन रासप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.ते सिंहगड कॉलेज कोर्टी पंढरपूर येथे आयोजित केलेल्या ईगल फौंडेशनच्या राष्ट्रीय गरूडझेप गुणगौरव सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले, समाजासाठी निस्पृह व निर्भिडपणे काम करणा-यांचा गौरव होणे हे सृजनशील समाजाचे लक्षण आहे.सत्कारामुळे संबंधित व्यक्ती अधिक जोमाने आपले काम पुढे सुरू ठेवत असते.

असे कार्यक्रम म्हणजे अखंड उत्साह वाढवणारे उर्जा स्त्रोत असतात. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शिवराज काटकर म्हणाले, समाजात काही लोक निरपेक्ष वृत्तीने काम करत असतात. त्यांचा गौरव होणे म्हणजे निकोप समाजाचे ते प्रतिक आहे. ईगल फौंडेशनचे काम हे गौरवास्पद असुन भविष्यात त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणाचे अभिवचन त्यांनी दिले.तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल विशेष मानपत्र देऊन केलेला गौरव हा माझ्यासाठी अभिमानास्पद आहे असेही ते म्हणाले.

दै.आधुनिक केसरीचे संपादक डॉ.प्रभू गोरे यांनीही मार्गदर्शन केले. व आपल्या पत्रकारितेचा केलेल्या विशेष मानपत्राचा अत्यंत आदराने व आनंदाने स्विकार करत असल्याचे स्पष्ट केले.यावेळी डॉ.सचिन पवार , शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री संभाजी पाटील, सौ.वैष्णवी बोरगावकर आदी पुरस्कार व्यक्तींनीही मनोगत व्यक्त केले .यावेळी खा.रामराव वडकुते यांचे चिरंजीव शशिकांत वडकुते यांनी खा.रामराव वडकुते यांचे मानपत्र स्विकारले.

यावेळी दै.नवा महाराष्ट्र चे सांगली जिल्हा आवृत्ती उपप्रमुख अर्जुन हजारे,TNP News चे महाराष्ट्र व गोवा हेड श्री सुनिल निकम,ईगल फौंडेशन चे अध्यक्ष विलासराव कोळेकर, प्रा.प्रकाश वंजोळे, प्रा.डॉ.महेश मोटे, पत्रकार दिनेश कांबळे , पंढरपूर येथील युवा नेते नितीन काळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यानिमित्ताने हिंगोलीचे खा.रामराव वडकुते , दै.आधुनिक केसरीचे संपादक डॉ. प्रभू गोरे व अखिल भारतीय मराठी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शिवराज काटकर यांचा विशेष मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.याबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, उद्योग, कृषी, पत्रकारिता आदी क्षेत्रांतील पुढील व्यक्तींना गौरविण्यात आले.त्यामध्ये सर्वश्री वैद्य विशाल उत्तम मोहिते व वैद्या सौ.पल्लवी विशाल मोहिते, सौ. रूपालीताई शिवाजीराव शिंदे, प्रा.राजकुमार बिराजदार,

अनंत ज्ञानसागर अकॅडमी,पेठ वडगांव, राजुल अनिल लाईन्सवाला, श्रीमती शैला बैसाणे,सौ.वैशाली विक्रम पाटील, श्री अरविंद महाकाळ ,श्री शशांक पंकजा सचिन कुडाळकर, श्री सुनील श्रीरंग ढमाळ, श्री सचिन बैरागी, श्री राजेंद्र साईनकर, श्रीमती सुरेखा जनार्दन चिंधे ,प्रा.अमीर मुमताज सलीम इनामदार ,श्री सतिश राजाराम लाड, श्री बंडू ईश्वर मोरे , डॉ. सुरैय्यापरवीन सैय्यद जिलानीपशा जाहागिरदार, श्री दादासाहेब बाबुराव पांढरे ,

प्रा.डॉ.अलका पांडूरंग पाटील, डॉ.मोशिना शहानवाज मुल्ला, प्रा.सौ. वर्षा वैभव पाटील, श्री आण्णासाहेब बापूसो पिंगळे, सौ.विमल प्रकाश एडगे,श्री राजेश विश्वनाथ भोसले, सौ.वैष्णवी विनोद बोरगावकर , श्री संतोष प्रभाकर वाळींबे, इकबाल उसमान जमादार, महेश रावसाहेब पाटील, श्री उत्तम शिर्के, श्री संजय पाटील , डॉ.भगवान मोहिते, श्री हेमंत पोटे, प्रा.कोंडिबा शिंदे, श्री गंगाधर किसनराव उबाळे, श्री भिमराव मारुती ताटे, श्री विकास ज्ञानेश्वर गायकवाड ,

श्री बजरंग बबन पवार, श्री बाळकृष्ण तानीराम अमृतकर, श्री सचिन रामलाल सदावर्ते, श्री रविंद्र वसंतराव शिंगाडे यांना मानपत्र , सन्मानचिन्ह व मानाचा फेटा बांधून गौरव करण्यात आला.सदर गुणगौरव सोहळा उत्कृष्टपणे पार पडला.यावेळी पत्रकार सर्वश्री रवि हजारे ,M 24 चॅनल चे संपादक दिलीप मोहिते, के.डी.पाटील,रहिम पठाण,संपत जाधव,आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. दिनेश कांबळे,बबलू श्रीराम,

श्री.अशोक शिंदे,संजय गायकवाड,श्री. दिपक पोतदार,श्री. संजय कदम, श्री प्रकाश वंजोळे , आकाश वडमिले,विजय जगताप, भास्कर सदावर्ते, अभिजित पाटील,आदींनी परिश्रम घेतले. सर्वांचे स्वागत विलासराव कोळेकर यांनी केले.तर आभार प्रा.महेश मोटे यांनी मानले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन श्री पोपट काटकर सर यांनी केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!