Sat, Sep 5, 2026
शिक्षण

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत द्रविड हायस्कूलचे घवघवीत यश

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत द्रविड हायस्कूलचे घवघवीत यश
Ashok Ithape
  • PublishedAugust 26, 2026

विरजा साळीचा राज्यस्तरावर चौथा क्रमांक; ७ हजार ५०० रुपयांचे रोख पारितोषिक

वाई : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने आयोजित ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा २०२६’ मध्ये डेक्कन एज्युकेशन संस्थेच्या द्रविड हायस्कूलने उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेतील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. विरजा विद्या विजयकुमार साळी हिने राज्यस्तरावर चौथा क्रमांक पटकावत विद्यालयाच्या शैक्षणिक यशात मानाचा तुरा रोवला.

ठाणे येथील गडकरी रंगायतन सभागृहात आयोजित पारितोषिक वितरण समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते विरजा साळी हिचा गौरव करण्यात आला. यावेळी तिला ७ हजार ५०० रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

विरजाला शाळेचे मराठी विभाग प्रमुख उमाकांत कोळीवैशाली हिरवे यांचे मार्गदर्शन लाभले. ज्ञान, वाचन व विश्वकोशीय माहितीचा अभ्यास यांचा प्रभावी उपयोग करून विरजाने राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे.

विरजा साळी ही वाईतील ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर व वाई तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालिका सौ. आशा मर्ढेकर यांची नात आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, नगराध्यक्ष अनिल सावंत, विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे, माजी नगरसेवक चरण गायकवाड, शालेय समितीचे अध्यक्ष नितीन पोरे, मुख्याध्यापक दत्तात्रय भोसले, उपमुख्याध्यापिका सौ. नेत्रा मुळे, पर्यवेक्षक घनश्याम नवले, डॉ. विजय मर्ढेकर, सौ. शकुंतला साळी, सौ. रिद्धी तुषार जंत्रे तसेच सर्व शिक्षक, पालक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विरजाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळ :
‘विश्वकोश ज्ञानवर्धन’ स्पर्धेतील राज्यस्तरीय विजेती द्रविड हायस्कूलची विद्यार्थिनी विरजा साळी हिचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी तिची आई सौ. विद्या साळी उपस्थित होत्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!