वाईच्या माजी मुख्याध्यापिका सुलोचना सणस यांचे निधन
वाई : वाई वकील संघाचे सदस्य, साहित्यिक व लेखक ॲड. उमेश सणस, डॉ. शैलेश सणस तसेच पुणे आकाशवाणीचे पत्रकार शिवराज सणस यांच्या मातोश्री आणि महर्षी शिंदे विद्या मंदिर व गर्ल्स हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती सुलोचना हणमंतराव सणस (वय ७८) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
श्रीमती सुलोचना सणस यांनी शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय सेवा बजावत अनेक विद्यार्थिनींच्या शैक्षणिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रासह वाईतील सामाजिक, साहित्यिक व विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्ट असा परिवार आहे.
अंत्यविधी आज सायंकाळी ६ वाजता वाई येथील वैकुंठ स्मशानभूमी, भीमकुंड आळी येथे होणार आहे.





















