Wed, Jul 29, 2026
महाराष्ट्र

कोयना धरण “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर” नावाने ओळखले जाणार

कोयना धरण “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर” नावाने ओळखले जाणार
Ashok Ithape
  • PublishedJuly 29, 2026

जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील

  • निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

मुंबई दि.२९ : पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामांतर “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर” असे करण्याचा महत्वपूर्ण आणि ऐतिहसिक निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जलशयाचे नामांतर करण्याबाबत विनंती केली होती. शासनाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून कोयना जलसागरास छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे ओळखले जाईल .

जलसागराचे नामांतर करण्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानंतर शासन निर्णय जारी झाल्याने येथून पुढे शासनाचा पत्रव्यवहार आणि अभिलेखा मध्ये तसा उल्लेख करण्यात येईल.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!