Tue, Jul 21, 2026
महिला विशेष

अतिदुर्गम नाणेल येथील बीएलओ आशाराणी यमकर ठरल्या ईएफ डिजिटायझेशन पूर्ण करणाऱ्या पहिल्या बीएलओ

अतिदुर्गम नाणेल येथील बीएलओ आशाराणी यमकर ठरल्या ईएफ डिजिटायझेशन पूर्ण करणाऱ्या पहिल्या बीएलओ
Ashok Ithape
  • PublishedJuly 10, 2026

सातारा दि.10- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या सातारा जिल्ह्यात मतदार यादीच्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR-2026)’ अंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओ मार्फत घरोघरी जाऊन गणना फॉर्म भरुन घेऊन त्याचे डिजिटायझेशन केले जात आहे. या मोहिमेत पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिदुर्गम असलेल्या ‘मौजे नाणेल’ (मतदार यादी भाग क्र. ३२) या गावातील मतदारांचे गणना प्रपत्र (EF) बीएलओ ॲपद्वारे शंभर टक्के ईएफ डिजिटायझेशन (EF Digitization) पूर्ण करणारे सातारा जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. बीएलओ आशाराणी रामचंद्र यमकर यांनी हे काम यशस्वीरित्या पूर्ण केले.

याबाबत बीएलओ श्रीमती आशाराणी यमकर यांचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक देऊन विशेष अभिनंदन करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे व उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण उपस्थित होते.

नाणेल या गावात एकूण २४७ मतदारांपैकी २४४ मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, उर्वरित तीन मतदारांपैकी एक मयत व दोन स्थलांतरित आहेत.

जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे आणि तहसिलदार अनंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळवण्यात आले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!