Tue, Jul 21, 2026
शिक्षण

राज्यात ओझर्डेच्या विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी; शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम व चौथा क्रमांक

राज्यात ओझर्डेच्या विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी; शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम व चौथा क्रमांक
Ashok Ithape
  • PublishedJuly 5, 2026

वाई, प्रतिनिधी : वाई तालुक्यातील ओझर्डे येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत ओझर्डे येथील विद्यार्थिनी स्वरा गार्डी हिने 97.33 टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच विद्यार्थी स्वराज कुंभार याने 95.33 टक्के गुणांसह राज्यात चौथा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची मेहनत, पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन असल्याचे मानले जात आहे. या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक, पालक, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ओझर्डे गावातील विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवर मिळविलेल्या या घवघवीत यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्तेची चमक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची राज्यभर दखल घेतली जात आहे.

स्वरा गार्डी आणि स्वराज कुंभार यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!