Tue, Jul 21, 2026
कृषी वार्ता

राज्य शासनाचे विविध कृषी पुरस्कार जाहीर

राज्य शासनाचे विविध कृषी पुरस्कार जाहीर
Ashok Ithape
  • PublishedJune 24, 2026

जिल्ह्यातील 6 शेतकरी व 1 अधिकारी यांची निवड

सातारा, दि.24: राज्यातील शेती, फालोत्पादन व कृषी संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या शेतकरी, संस्था व व्यक्तीना दिल्या जाणाऱ्या राज्य सरकारच्या प्रतिष्ठेच्या विभाग निहाय कृषी पुरास्कारांची सन २०२३ व २०२४ साठी घोषणा करण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण 6 शेतकरी व 1 अधिकारी यांची निवड झाली आहे.

वसंतराव नाईक कृषीभूषण श्री गणपत रामचंद्र पारटे रा. भिलार ता. महाबळेश्वर, युवा शेतकरी  श्रीकांत महादेव घोरपडे रा. निसराले ता.सातारा, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार ऋषिकेश जयसिंग ढाणे रा. पाडळी ता सातारा, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न अंकुश रामचंद्र सोनावले सहाय्यक कृषी अधिकारी खोजेवाडी ता. सातारा, उद्यान पंडित श्री बबन रामचंद्र मुळीक रा. सासकल ता. फलटण, कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार अनंत हनमंतराव माने रा. रहिमतपूर ता. कोरेगाव व  वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार हिंमंतराव हिंदुराव पाटील रा. सुपने ता. कराड यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

कृषी विभागाने २०२३ व २०२४ च्या विविध दहा पुरस्कारासाठी राज्यभरातील ९३ व ९१ अशी एकूण १८४ शेतकरी व्यक्ती, संस्था आणि गटांची निवड केली आहे. राज्यातील कृषी क्षेत्रातील नवकल्पना, उत्पादन वाढ, शाश्वत शेती फालोत्पादन आणि शेतकरी मार्गदर्शन या मधील उल्लेख निहाय योगदानाची दाखल घेऊन हा सन्मान दिला जातो.

कृषी विभागाच्या शासन निर्णयनुसार पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, सेंद्रिय शेती कृषीभूषण. वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यान पंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार आणि पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न अशा विविध कृषी पुरस्कारंचा समावेश आहे. कृषी पुरस्कारासाठी निवड झालेल्या पुरस्कारर्थी यांना सपत्नीक १ जुलै २०२६ रोजी नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (NSCI Dome), वरळी, मुंबई येथे राज्यपाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!