Fri, May 29, 2026
Close

Recent Posts

सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्धः अफवांवर विश्वास ठेवून साठेबाजी न करण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे नागरिकांना आवाहन

सातारा जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्धः अफवांवर विश्वास ठेवून साठेबाजी न करण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे नागरिकांना आवाहन
Ashok Ithape
  • PublishedMay 29, 2026

सातारा जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्धः अफवांवर विश्वास ठेवून साठेबाजी न करण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे नागरिकांना आवाहन

सातारा दि.२९ – आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेल वितरण विस्कळीत होण्याच्या शक्यतेने जिल्ह्यात काही ठिकाणी इंधन टंचाईच्या अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा आणि विविध ऑईल कंपन्यांचे (IOCL/BPCL/HPCL) विक्री अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला.

सातारा जिल्ह्यात एकूण ३३८ पेट्रोल पंप कार्यरत आहेत. जिल्ह्याला हवेली (पुणे), मिरज (सांगली) आणि पाकणी (सोलापूर) या तीन वेगवेगळ्या ऑईल डेपो (Oil Depots) मधून नियमित तेलाचा पुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी दररोज ६०० किलोलीटर (KL) पेट्रोल आणि १००० किलोलीटर (KL) डिझेलची (1 किलोलीटर म्हणजे 1000 लिटर) विक्री होते.

आजघडीला सातारा जिल्ह्यात पेट्रोलचा २७७६ किलोलीटर व डीझेलचा ३६७१ किलोलिटर असा पुरेसा साठा शिल्लक आहे. तसेच ऑईल कंपन्यांकडूनही मागणीनुसार दररोज पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. इंधन पुरवठा करणारे तिन्ही डेपो सातारा जिल्ह्याच्या जवळ असल्याने पुरवठ्यात कोणताही खंड पडणार नाही असे ऑईल कंपनीकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!