Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

शिक्षण

ब्युटी ऍण्ड वेलनेस क्षेत्रात युवा वर्गासाठी करिअरच्या अनेक संधी – ॲड. तेजा काटदरे.

ब्युटी ऍण्ड वेलनेस क्षेत्रात युवा वर्गासाठी करिअरच्या अनेक संधी – ॲड. तेजा काटदरे.
Ashok Ithape
  • PublishedMay 13, 2026

सुरभि अकॅडमी ऑफ स्किल्स, फेमिना व यशस्वी ग्रुप यांचा संयुक्त उपक्रम.

वाई : दि. 11 मे  : ब्युटी अँड वेलनेस क्षेत्रात युवक युवतींसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध आहेत त्यासाठी या क्षेत्रातील प्रशिक्षण घेऊन अशा करिअर संधींचा लाभ घेता येईल असे मत उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.तेजा काटदरे यांनी व्यक्त केले.

ब्युटी अँड वेलनेस या सौंदर्य क्षेत्रातील विविध प्रगत अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणाऱ्या फेमिना फ्लॉन्ट अकॅडमीचे उद्घाटन करताना त्या सोमवारी वाई येथे बोलत होत्या.

या उद्घाटन सोहळ्याला हिंदुस्तान लिव्हर कंपनीचे निवृत्त महाव्यवस्थापक दिलीप काटदरे,
फेमिनाच्या ऑपरेशन हेड स्नेहा वासानी, सुरभि अकॅडमीच्या प्रमुख स्वाती हेरकळ यांच्यासह यशस्वी अकॅडमीचे समीर तगारे,अदिती कांबळे व वाई येथील फेमिना प्लॉट अकॅडमीच्या केंद्रप्रमुख प्राची हेरकळ यादेखील उपस्थित होत्या.

ब्युटी, हेअर, स्किन, नेल्स अशा ब्युटी अँड वेलनेस क्षेत्रातील विविध प्रकारांच्या सौंदर्य उपचार पद्धतींबाबतचे अद्ययावत प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांमार्फत या अकॅडमीमध्ये देण्यात येणार आहे.
गेल्या 31 वर्षांहून अधिक काळापासून वाई आणि परिसरात शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या सुरभि अकॅडमीच्या पुढाकाराने वाई परिसरातील युवा वर्गासाठी करियर संधीचे हे नवे दालन सुरू करण्यात आल्याचा आपल्याला अभिमान वाटतो असे सुरभि अकॅडमीच्या प्रमुख स्वाती हेरकळ यावेळी त्यांच्या मनोगतात म्हणाल्या.

आजच्या स्पर्धात्मक युगात ब्युटी व वेलनेस उद्योगात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेमिना फ्लॉंट अकॅडेमी एक सक्षम व विश्वासार्ह व्यासपीठ ठरणार आहे. येथे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधींबरोबरच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाईल.

वाई शहरासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, स्थानिक तरुणांना नव्या करिअर संधींचे दालन खुले झाले आहे, असे मत केंद्रप्रमुख प्राची हेरकळ यांनी व्यक्त केले.

तर गेल्या अनेक वर्षांपासून सुरभि अकॅडमीचे कामकाज मी जवळून पाहत आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल या पद्धतीने विद्यार्थीभिमुख काम करणाऱ्या
सुरभि अकॅडमीला या नवीन शैक्षणिक पर्वासाठी आपण शुभेच्छा देतो,असे मत हिंदुस्थान लिव्हर कंपनीचे निवृत्त महाव्यवस्थापक दिलीप काटदरे यांनी व्यक्त केले.

यावेळी फेमिनाच्या ऑपरेशन हेड स्नेहा वासानी यांनी मुलींसोबतच मुलांनाही ब्युटी अँड वेलनेस क्षेत्रात कशाप्रकारे रोजगार संधी उपलब्ध आहेत हे सांगत या क्षेत्रातील प्रशिक्षण घेतल्यामुळे अगदी महिना लाखोंचे उत्पन्न आपण कौशल्य प्राप्त केल्यानंतर मिळवू शकतो असेही विविध उदाहरणांचे दाखले देत सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर तगारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन.
राजेंद्र हेरकळ यांनी केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!