शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यात ८ ते २२ मार्चदरम्यान ‘जलमहोत्सव’
![]()
ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा बळकट करण्यासाठी व्यापक लोकचळवळ
सातारा : ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी तसेच सामुदायिक लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशाने, राज्य व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. ८ ते २२ मार्च या कालावधीत जलमहोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती याशनी नागराजन यांनी दिली.
या महोत्सवाअंतर्गत जिल्ह्यातील गावोगावी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. पाणी ही केवळ पायाभूत सुविधा नसून, सांस्कृतिक मूल्य म्हणून पाण्याची जपणूक व्हावी, हा जलमहोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. पाणीसंवर्धनासाठी स्थानिक परंपरा व पारंपरिक उपायांचा उपयोग करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
महिलांचा सहभाग व पाणी गुणवत्ता तपासणी
गावागावात महिलांना पाणी तपासणीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
FTK (फिल्ड टेस्टिंग किट)द्वारे पाण्याच्या गुणवत्तेची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल.
युवक, शाळा व ग्रामविकास
प्रत्येक गावात युवकांचा जलसंवर्धनासाठी सहभाग वाढवण्यासाठी ‘यंग ब्रिगेड’ स्थापन केली जाईल.
जिल्ह्यातील शाळांमध्ये जलसंवर्धन विषयक स्पर्धा आयोजित केल्या जातील.
ग्रामपंचायत विकास आराखड्यात जलसंवर्धन उपाययोजनांचा समावेश करण्यावर भर दिला जाणार आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत करण्यासाठी दि. ८ ते २२ मार्च या कालावधीत जलमहोत्सव राबवला जाणार असल्याची माहिती प्रज्ञा माने भोसले यांनी दिली. गाव व पंचायत समिती स्तरावर लोकजल उत्सव आयोजित केले जातील, जे पूर्णतः लोकसहभागावर आधारित असतील.
- जलमहोत्सवामागील उद्दिष्टे
पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक व सामाजिक प्राधान्य देणे
स्थानिक जलउत्सव संस्थात्मक करण्यासाठी प्रोत्साहन
राज्य ते गावस्तरापर्यंत विभागांमध्ये समन्वय
पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा व देखभाल-दुरुस्तीसाठी दीर्घकालीन आराखडा
आरोग्य, पोषण व महिला सक्षमीकरण यांना जलसेवेशी जोडणे
ही माहिती देताना गौरव चक्के यांनी जलमहोत्सवाचे महत्त्व स्पष्ट केले.
जलमहोत्सव – ठळक उपक्रम दि. ८ ते २२ मार्च दरम्यान ग्रामसभा घेऊन जल अर्पण व जल आकलनVWSC समितीद्वारे प्रत्यक्ष जलसंवर्धन कृतीलोकप्रतिनिधी व नागरिकांच्या पुढाकारातून वनराई बंधारे, माती बंधारे, CCT, जलतारा, शोषखड्डेजलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन व स्वच्छतापाणीपुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतरण व सामुदायिक जल शपथग्रामपंचायत विकास आराखड्यात जलसंवर्धन उपायांचा समावेश— याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा













