Thu, Apr 2, 2026
राजकीय बातमीपत्र

सोलापूर कन्या प्रा.डॉ.ज्योती वाघमारे हिचे आणि धडाकेबाज निर्णयाबद्दल ना. एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन!

सोलापूर कन्या प्रा.डॉ.ज्योती वाघमारे हिचे आणि धडाकेबाज निर्णयाबद्दल ना. एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन!
Ashok Ithape
  • PublishedMarch 5, 2026

मुंबई, दि. ५:महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीतील आणि सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक -राजकीय वाटचालीतील आजचा दिवस ऐतिहासिक ठरेल. प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल झाला आणि बिनविरोध विजयी झाल्या. त्यांना उमेदवारी देण्याचा धडाकेबाज निर्णय घेवून शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवा इतिहास रचला!

डॉ. ज्योती वाघमारे यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या डॉ. ज्योती उपजत गुणवत्ता आणि कष्टाच्या बळावर त्यांची आजवरची वाटचाल राहिली आहे. बारावी बोर्ड परीक्षेत त्या राज्यात पहिल्या आल्या होत्या. अभ्यासू वृत्ती,परिश्रम आणि आंबेडकरी चळवळीची कास धरत त्यांनी आपला प्रवास सुरु ठेवला. व्यासंगी प्राध्यापिका, प्रभावी वक्त्या, प्रवाही शैलीच्या वृत्त निवेदिका व सूत्रसंचालिका अशी ख्याती प्राप्त केली.

खरे रत्नपारखी ठरले ते शिवसेना नेते एकनाथ शिंदे. त्यांनी डॉ. ज्योती वाघमारे यांची गुणवत्ता हेरली आणि चार वर्षांपूर्वी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून कार्य करण्याची संधी दिली. डॉ. ज्योती यांनी संधीचे सोने केले. अल्पावधीतच त्या आक्रमक आणि अभ्यासू प्रवक्त्या म्हणून नावारूपास आल्या. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड या भाषेवरील प्रभुत्व आणि व्यापक वाचन ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष गूण आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!