एम-सॅन्ड उत्पादनासाठी इच्छुक व्यक्ती, व्यावसायिकांनी अर्ज करावेत – जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा, दि.13 : नैसर्गिक वाळूला एम-सॅन्ड (कृत्रिम वाळू) पर्याय म्हणून विकास करण्याच्या अनुषंगाने धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. याठी कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे. या धोरणाच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कार्यरत असलेले मंजुर खाणपट्टाधारक, तात्पुरता परवानाधारक व कोणत्याही प्रकाराचा खाणपट्टा नसलेले परंतू एम-सॅन्ड युनिट स्थापण करुन कृत्रिम वाळूची निर्मिती करु इच्छित असणारे व्यक्ती, संस्था यांनी कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज यांच्या नावे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
अर्जासोबत गट नं., नकाशा, 7/12, वैयक्तिक अर्ज असल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, संस्थेचा अर्ज असल्यास संस्थेबाबतची कागदपत्रे, अर्ज फी रक्कम रुपये 500/- तसेच एम-सॅन्ड युनिट ज्या ठिकाणी स्थापन करावयाचे आहे त्या ठिकाणचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचेकडील consent to establish व consent to operate बाबतचे प्रमाणपत्र, 100 टक्के एम-सॅन्ड युनिट उत्पादित करण्याबाबतचे रुपये 100/-च्या स्टॅम्पपेरवरील हमीपत्र, तसेच एम-सॅन्ड उत्पादित करण्यासाठी दगड कोणत्या खाणपट्टयातुन किंवा इतर स्त्रोतांतून आणण्यात येणार आहे त्या खाणपट्ट्याच्या अथवा स्त्रोताचा तपशिल. एम-सॅन्ड युनिट बसविण्यात येणार आहे अशा क्षेत्राबाबत संबंधित नियोजित प्राधिकरणाकडून त्याबाबतचा वापर अनुज्ञेय आहे किवा कसे याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र, आवश्यक त्या ठिकाणी अकृषीक परवानगी आदेश, तसेच उद्योग आधार नोंदणी / जिल्हा उद्योग केंद्र यांची नोंदणी असणारे प्रमाणपत्र व व्यापारी परवाना घेणे बंधनकारक आहे. ज्या व्यक्ती / संस्था यांना हेतुपत्र देण्यात आले असेल अशा व्यक्ती / संस्था यांना महसूल व वनविभाच्या 23 मे, 2025 रोजीच्या शासन निर्णयामधील औद्योगिक प्रोत्साहन अनुदान, व्याज अनुदान, विद्युत शुल्कातुन सुट व वीज दर अनुदान राहिल.
गुंतवणुक प्रोत्साहान अनुज्ञेय असेल. रॉयल्टी प्रतिब्रास रु.400 सवलत. (रु. 200 प्रतिब्रास दराची तरतूद) आहे. 100 टक्के एम-सॅन्ड (कृत्रिम वाळू) उत्पदित करुन इच्छिना-या व्यक्ति / संस्था यांनी तसेच यापुर्वी संबंधित एम-सॅन्ड उत्पादन करणा-या युनिटधारकाने महाखनिज या संगणक प्रणालीवर अर्ज केला असल्यास त्यांनी पुन्हा नव्याने जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करणे आवश्यक राहील. सदरबाबत काही अडचणी अथवा शंका असलेस गौणखजिन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांचेशी संपर्क साधावा.













