Thu, Jan 15, 2026
प्रशासन सरपंचनामा

सरपंचाचा मंत्री झालो, म्हणून जनतेच्या वेदनांची कल्पना

सरपंचाचा मंत्री झालो, म्हणून जनतेच्या वेदनांची कल्पना
Ashok Ithape
  • PublishedFebruary 24, 2025

ना.मकरंद पाटील यांचे महा आवास योजनेच्या वाईतील कार्यक्रमात प्रतिपादन

वाई / प्रतिनिधी : समाजकारण व राजकारणाचा वारसा वडिलांकडून लाभला असला तरी, सरपंच पदापासून माझी राजकीय कारकीर्द सुरू झाल्याने मला सर्वसामान्यांच्या व्यथा, वेदना व दुःखांची पूर्ण कल्पना आहे. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा सर्वांना मिळाव्यात आणि मतदारसंघातील एकही नागरिक निवाऱ्या अभावी राहू नये, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंदआबा पाटील यांनी व्यक्त केले आहे.

येथील देशभक्त किसनवीर सभागृहात नुकताच एक जाहीर कार्यक्रम झाला. त्यामध्ये महा आवास अभियान 2024-25 मधील कामांचा शुभारंभ, पी.एम. जनमन योजनेअंतर्गत कातकरी कुटुंबाना घरकुलासाठी जागा वाटप व प्रथम हप्ता वितरण आणि वाई स्वच्छता चषक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच ना. मकरंदआबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. माझ्या मतदारसंघातील एकही कुटुंब निवाऱ्याशिवाय वंचित राहू नये, यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान उंचविण्याकरिता दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा ) पाटील यांनी सुरु केलेल्या संत गाडगे बाबा अभियानामध्ये मी बोपेगावचा सरपंच असताना पाणी व स्वच्छता विषयक बाबींवर लोकसहभागातून स्वच्छताविषयक कामकाज केले होते व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानमध्ये दुसर्‍या कमाकाचे बक्षिस मिळवले होते.
सर्वसामान्य जनतेच्या मनात स्वच्छतेची आवड निर्माण होणेसाठी अहोरात्र प्रयत्न केले, त्यामुळेच आज सरपंचाचा मंत्री झालो, याचे समाधान वाटते.

यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांना संबोधित करताना या उपक्रमामध्ये वाई मतदार संघाचे नाव उंचावणार असल्याचे तसेच त्या माध्यमातून समाजसेवेचे नवे पर्व सध्या करण्यासाठी सक्रिय राहणार असल्याचेही ना. पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमामध्ये वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी केंद्र शासनाच्या सर्व योजना आणि अभियान यशस्वीपणे राबविण्याकरिता प्रशासन कटीबद्ध असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती मा. विक्रांत (भैय्या) डोंगरे, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गायकवाड, रवींद्र सोनवणे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक रुपेश मोरे, विस्तार अधिकारी रोहित जाधव, तालुका समन्वयक, सौ. स्वाती जाधव, विविध गावच्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायतींचे सदस्य, घरकुल लाभार्थी, ग्रामस्थ आणि कर्मचारी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!