गरवारे वाई हाफ मॅरेथॉन अतिशय उत्साहात संपन्न
वाई, दि. ९ : वाई शहर व गरवारे कंपनीचे पहिल्यापासूनच कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. गरवारे परिवार सामाजिक चळवळी बरोबर आरोग्य चळवळीमध्ये ही सदैव कार्यरत आहे. या आराेग्यचळवळीचा भाग ही गरवारे वाई हाफ मॅरेथॉन असून यापुढील काळा मॅरेथाॅन अशीच उत्कृष्ट व्हावी, असे उदगार गरवारे टेक्निकल फायबर्स लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वायू गरवारे यांनी काढले.

वाई हाफ मॅरेथॉनच्या पाचव्या आवृत्तीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून रविवारी झालेल्या या हाफ मॅरेथॉनमध्ये २७०० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. या मॅरेथाॅनच्या पारिताेषीक वितरण कार्यक्रमाप्रसंगी गरवारे टेक्निकल फायबर्स लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वायु गरवारे बाेलत हाेते. याप्रसंगी गरवारे टेक्निकल फायबर्स लि., विमलाबाई गरवारे संशोधन संस्था. आणि गरवारे संशोधन संस्थेच्या संचालिका मयुरी वायू गरवारे, प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी, एच. आर. विभाग प्रमुख रवेंद्र मिश्रा, प्रबाेध कामत, राजेंद्र शिवरायकर, व्हाईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी, दिशा अॅकॅडमीचे प्रमुख नितीन कदम, उद्याेजक उमेश गुजर यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

वायु गरवारे पुढे म्हणाले, वाई आणि गरवारे कंपनीचे कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. मांढरदेव ॲथलेटिक फाउंडेशन व टीम वाईने सलग पाचव्या वर्षी या स्पर्धेचे उत्कृष्ट संयोजन केले आहे. पुढील काळात या मॅरेथॉन चे स्वरुप भव्य व्हावे, अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मयुरी गरवारे म्हणाल्या, ७५ हून अधिक देशांशी गरवारे हा उद्योग जोडला गेला आहे. ही मॅरेथॉन म्हणजे स्थानिकांमध्ये आरोग्यविषयक जाणीव जागृत करणारा हा उपक्रम आहे. ज्याप्रमाणे पाच वर्षात या मॅरेथॉन एक भव्य उंची गाठली आहे. छाेट्या राेपट्यासारखे लावलेल्या गरवारे कंपनीचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर होताना आपणास दिसत आहे. यामध्ये वाईकरांचा सहभाग माेठा आहे.
प्रा. डॉ.नितीन कदम यांनी क्रीडापटूंच्या नैसर्गिक क्षमता विकासासाठी गरवारे उद्योगाने आर्थिक बळ पुरवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
स्पर्धेतील गटवार विजेते याप्रमाणे : १० किमी अंतर- १२ ते १७ वयाेगट (पुरूष) (अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय) अथर्व ताटे, साेहम साळुंखे, अर्जुन लवटे, (महिला) श्रावणी लिबे, चैताली चव्हाण, साक्षी भनासे,
वयाेगट १८ ते ३४ (पुरूष) माेहित जगताप, आदित्य सुतार, करण सरवदे, (महिला) आरती सणस, वैष्णवी शिंदे, शिवानी नवघणे
३५ ते ४४ वयाेगट (पुरूष) कृष्णात साेनमळे, प्रशांत आलदर, याेगेश जाधव, (महिला) स्मिता शिंदे, शैलजा पाटणकर व दिपाली शिंदे
वयाेगट ४५ ते ५४ (पुुरुष) संतू वर्दे, अरविंद नलवडे, विठ्ठल अरगडे, (महिला) सुनीता अरगडे, डाॅ. शुभांगी गायकवाड, मीना मागव, ५५ वरील (पुरूष) जाॅर्ज थाॅमस, संभाजी बनसाेडे, नारायण गाेळे, (महिला) – संगीता उबाळे, प्रिता नेईकार, स्मिता बाजी
२१ किमी अंतर वयाेगट: १८ ते ३४ (पुरूष) दिनेश पाटील, करण वागळे, स्वप्निल काेचळे (महिला) वैष्णवी माेरे, साक्षी कसबे व विशाखा शिंदे
वयाेगट ३५ ते ४४ (पुरूष) नाथा गिरनेकर, तानाजी नलवडे, सचिन निकम, (महिला) अलमास मुलाणी, माधवी नवघणे, दिपाली किर्दत
वयाेगट ४५ ते ५४ (पुरूष) सावलीराम शिंदे, रवींद्र जगदाळे, सचिन शिवथरे, (महिला) माधुरी शिवदे, कविता जाधव, नीलम रायचढ्ढा.
५५ किमी वरील (पुरुष) कल्लापा थिरवीर, लक्ष्मण यादव, अजय भैताड (महिला) सुशन जाेश
टीम वाई स्पोर्ट्स फाउंडेशन चे अध्यक्ष दीपक ओसवाल यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या यांच्या हस्ते धावपटूंना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. राजगुरू कोचळे, नंदकुमार माने, गिरीश गाढवे, महावीर कुपाडे विलास माळी, नितीन देसाई,सचिन खरात गोपाळ गरुड, शिवाजी निकम, नंदकुमार डोईफोडे, नितीन पिसाळ यांनी स्वागत केले. सुधीर जमदाडे यांनी सूत्रसंचालन, तर टीम वाई स्पोर्ट्स फाउंडेशन चे सचिव धोंडीराम वाडकर यांनी आभार मानले. वॉर्मिंग अप साठी झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले. अतिशय सुंदर नियोजन आणि रूट सपोर्ट खूप चांगला होता अशा प्रतिक्रिया सर्व धावपटूंनी दिल्या.













