Thu, Jan 15, 2026
प्रशासन

कर्तव्याप्रती निष्ठा असणाऱ्या अभियंत्याची नवीन इनिंग सुरू

कर्तव्याप्रती निष्ठा असणाऱ्या अभियंत्याची नवीन इनिंग सुरू
Ashok Ithape
  • PublishedDecember 5, 2024

सुनील कारंजकर यांच्या सेवानिवृत्ती सत्कार प्रसंगी कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी यांचे प्रतिपादन

सातारा / प्रतिनिधी : सेवानिवृत्ती ही जीवनाची नवी आवृत्ती असते. त्याला आनंदाने सामोरे गेले पाहिजे. सुनील कारंजकर हे कर्तव्याप्रती निष्ठा असणाऱ्या कर्तव्यदक्ष अभियंत्यांपैकी एक आहेत. सेवाकाळात त्यांनी केलेले काम आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे, असे मत जिल्हा परिषद बांधकाम उत्तर चे कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी यांनी व्यक्त केले.

जि. प. बांधकाम उपविभाग वाई येथील शाखा अभियंता सुनील कारंजकर यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून सातारा येथे लेक व्ह्यू सभागृहात बोलत होते.

यावेळी श्री. कारंजकर यांच्या मातोश्री श्रीमती मालती कारंजकर, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिरीष चिटणीस,जि. प. बांधकाम वाई उपविभागाचे उपअभियंता संजय जाधव, निवृत्त अभियंता संघटनेचे अध्यक्ष सुरेश बारटक्के, दिलीप साबळे, उमाकांत पिसे, विजय खोत, श्री. पानसकर, श्री. फडतरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

शासकीय नोकरी म्हणजे केवळ पाट्या टाकणे नव्हे, तर कामामध्ये समरस होऊन तहानभूक विसरणे ही कर्तव्यतत्परता कारंजकर यांच्या ठायी दिसून येते, असे सांगून श्री. मोदी यांनी सुनील कारंजकर यांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला.

यावेळी काकासाहेब पाटील, सुरेश बाररटके, संजय जाधव, श्री. पानसकर, संजय खोत, श्री. फडतरे, नंदकुमार कुराडे, अतुल शहा, भिकाजी लवळे, सौ. शांता लंगडे, ‘साप्ताहिक पोवई नाका’चे संपादक अजित भिलारे, राजेंद्र गायकवाड आदींची भाषणे झाली.
सौ. सविता कारंजकर यांनी प्रास्ताविकामध्ये सुरेल सहजीवनाचा प्रवास विशद करतानाच श्री. कारंजकर यांच्या स्वभावाचे विविध पैलू सांगितले.

सुनील कारंजकर यांनी सत्कारास उत्तर देताना सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जीवनप्रवासात प्रतिकूलतेवर मात करून घेतलेली भरारी व हातून झालेले कार्य ही ईश्वरी योजना आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. संगीत, चित्रकला, वाचन, भ्रमंती आदी छंदांना निवृत्तीनंतर अधिक वेळ देणार असल्याचेही त्यांनी सांगितले‌.
राजेंद्र कारंजकर, नितीन कारंजकर, मिलिंद कारंजकर आदींनी मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रहिमतपूरचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील माने, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, माजी नगराध्यक्ष रमेश माने, बेदील माने, विद्याधर बाजारे, आकाशवाणीच्या निवृत्त अभियंता सौ. उमराणी आदींनी श्री. कारंजकर यांचा सपत्नीक सत्कार केला.

कार्यक्रमास सातारा आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सचिन प्रभुणे, योग विद्या धामच्या अध्यक्षा डॉ शैलजा ठोके, डॉ. जयवंत ठोके, बाळकृष्ण लंगडे, जयवंत पोरे, सौ. जीविता पोरे, राजकिरण लंगडे, करसल्लागार सारंग कोल्हापुरे, सौ. श्वेता कोल्हापुरे, ॲड विकास पाटील – शिरगावकर, सौ सुजाता पाटील, राष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू संचिता नाईक, श्री. टिकोले , बाबासो कुंभार, विक्रांत शिंदे, श्री. तवटे, ब्रह्मदेव जगताप, श्री. कांबळे, ए. जे. पाटील, श्रीकांत कुलकर्णी, ए. ए. आमले, उपअभियंता संजय खोत सा.बा.उपविभाग, वडूज, बी. आर. कोळी, केदार गायकवाड, प्रदीप मोरे, रणजीत गायकवाड, वैभव बिचकर, श्री. गुरव, श्री. पांढरे, श्री. गोरे, श्री. गार्डे, श्री. पिसे, श्री. साजणे, रोहित भोसले, सातारा आकाशवाणीचे हेमंत गौड, विठ्ठल हेंद्रे, सौ. कविता प्रभुणे, सौ. नेहा मांगलेकर, सौ. सुप्रिया मोरे, सौ. श्रेया गोलिवडेकर, सौ. मनाली फडतरे, सौ. मुग्धा कुंभारे, संकल्प न्यूज वृतसमूहाचे अशोक इथापे आदींसह जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, योग विद्या धाम, नामदेव शिंपी समाज संघटना, वाय. सी. कॉलेज माजी विद्यार्थी मंडळ सदस्य, सनी क्लब सदस्य आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व श्री. कारंजकर यांचे आप्त, मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंत लंगडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!